मिरजेत ख्वाजा वसाहतीत एकास हत्याराच्या धाकाने लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 05:11 IST2020-12-05T05:11:25+5:302020-12-05T05:11:25+5:30

शौकत शेख, भाग्यराज दारला, मोजेस भंडारे व प्रथमेश संकपाळ या चौघांनी माणिकनगर रेल्वे कर्मचारी वसाहतीत गुरुवारी समीर शेख या ...

In Miraj Khwaja colony, one was robbed by a murderer | मिरजेत ख्वाजा वसाहतीत एकास हत्याराच्या धाकाने लुटले

मिरजेत ख्वाजा वसाहतीत एकास हत्याराच्या धाकाने लुटले

शौकत शेख, भाग्यराज दारला, मोजेस भंडारे व प्रथमेश संकपाळ या चौघांनी माणिकनगर रेल्वे कर्मचारी वसाहतीत गुरुवारी समीर शेख या तरुणावर कोयत्याने हल्ला केला. या टोळक्याने अब्दुलकरीम इनामदार यांना मावा खाण्याच्या निमित्ताने ख्वाजा वसाहतीत मोबाईल टॉवरजवळ नेले. शौकत शेख याने इनामदार यांना ‘मी इथला दादा आहे, तुझ्याजवळचे सर्व पैसे मला काढून दे’, असे सांगितले. त्यावर इनामदार यांनी, माझ्याजवळ पैसे नाहीत असे सांगताच भंडारे व संकपाळ या दोघांनी इनामदार यांना पाठीमागून पकडले, तर शेख याने इनामदार यांच्या खिशातून जबरदस्तीने एक हजार रुपये काढून घेतले. यावेळी इनामदार यांना हत्यार दाखवत जिवे मारण्याची धमकी दिल्याचे इनामदार यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत गांधी चौक पोलीस ठाण्यात नोंद आहे.

Web Title: In Miraj Khwaja colony, one was robbed by a murderer