मिरजेत काँग्रेस महिला आघाडीचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:18 IST2021-06-10T04:18:27+5:302021-06-10T04:18:27+5:30
पेट्रोल, डिझेल व गॅसचे दर वाढतच आहेत. पेट्रोल शंभरीच्या पार पोहोचले आहे. मिरजेत काँग्रेस महिला आघाडीतर्फे इंधन ...

मिरजेत काँग्रेस महिला आघाडीचे आंदोलन
पेट्रोल, डिझेल व गॅसचे दर वाढतच आहेत. पेट्रोल शंभरीच्या पार पोहोचले आहे. मिरजेत काँग्रेस महिला आघाडीतर्फे इंधन दरवाढीचा निषेध करण्यात आला. गांधी चाैकात पेट्रोल पंपासमोर काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्ष शैलजाभाभी पाटील व जिल्हाध्यक्षा नगरसेविका वहिदा नायकवडी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारविरुद्ध आंदोलन करण्यात आले. यावेळी मोदी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. पेट्रोल पंपावर येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला गुलाबाचे फूल देऊन इंधन दरवाढीचा निषेध करण्यात आला. यावेळी आरती वळीवडे, शुभांगी साळुंखे, विद्या नलावडे, अर्चना कबाडे, वत्सला माने, वहिदा पटेल, ज्योती पोपटानी, नगरसेवक करण जामदार, अय्याज नायकवडी, योगेश जाधव, धनराज सातपुते, स्वराज पाटील, सुनील गुळावणे, अमोल पाटील, डोमनिक फर्नांडिस, सलीम शेख, याकूब बागवान यांच्यासह महिला पदाधिकारी आंदोलनात सहभागी होत्या.