मिरजेत सफाई कर्मचारी संघटनेचा आंदोलनाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:26 IST2021-09-25T04:26:59+5:302021-09-25T04:26:59+5:30

महापालिकेच्या सर्व प्रभारी स्वच्छता निरीक्षकांची कायमस्वरूपी या पदावर नेमणूक करावी, नेमणूक होईपर्यंत स्वच्छता निरीक्षकांना मूळ वेतन श्रेणी व सर्व ...

Miraj cleaning workers' union warning of agitation | मिरजेत सफाई कर्मचारी संघटनेचा आंदोलनाचा इशारा

मिरजेत सफाई कर्मचारी संघटनेचा आंदोलनाचा इशारा

महापालिकेच्या सर्व प्रभारी स्वच्छता निरीक्षकांची कायमस्वरूपी या पदावर नेमणूक करावी, नेमणूक होईपर्यंत स्वच्छता निरीक्षकांना मूळ वेतन श्रेणी व सर्व सुविधा द्याव्या, महापालिकेच्या सर्व प्रभारी मुकादमांना या पदाची वेतन श्रेणी सुरू करावी, मानधन रोजंदारी, बदली व कायम कर्मचाऱ्यांचा विमा संरक्षण महापालिकेने द्यावे, महापालिकेच्या नवीन आकृतीबंधास शासनाकडून मंजुरी मिळाल्यानंतर, सर्वप्रथम मानधन बदली कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करून घ्यावे व उर्वरित जागा नवीन भरती प्रक्रियेने पूर्ण कराव्यात या मागण्यांबाबत ५ ऑक्टोबरपर्यंत निर्णय झाला नाही तर ७ ऑक्टोबर रोजी महापालिकेच्या सांगली मुख्यालयावर मोर्चा काढणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष डॉ. महेश कांबळे यांनी सांगितले.

अधिकाऱ्यांकडून सफाई कर्मचाऱ्यांना मिळत असलेल्या वागणुकीबद्दलही अतिरिक्त आयुक्तांना जाब विचारण्यात आला. अशा घटना पुन्हा घडल्यास काम बंद आंदोलनाचा इशारा देण्यात आला. अतिरिक्त आयुक्त दत्तात्रय लांघी यांनी असा प्रकार पुन्हा होणार नाही, असे आश्वासन दिले.

Web Title: Miraj cleaning workers' union warning of agitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.