मिरज सिव्हिलची लिफ्ट झाली बंद

By Admin | Updated: August 31, 2014 23:57 IST2014-08-31T22:46:19+5:302014-08-31T23:57:17+5:30

रुग्णांचे हाल : स्ट्रेचर, व्हीलचेअर नादुरूस्त

Miraj Civil lift stopped | मिरज सिव्हिलची लिफ्ट झाली बंद

मिरज सिव्हिलची लिफ्ट झाली बंद

मिरज : मिरजेतील शासकीय रुग्णालयाची लिफ्ट कायम बंद असल्याने रुग्णांचे हाल सुरू आहेत. शासकीय रुग्णालयात मिरजेसह परिसरातील तालुक्यातून व कर्नाटकातून रुग्ण येतात. रुग्णालयात उपचारासाठी दाखल रुग्णांना एक्सरे, सोनोग्राफी, डायलेसीस अशाप्रकारच्या तपासण्या करण्यासाठी लिफ्ट बंद असल्याने नेणे-आणणे अवघड ठरत आहे.
शासकीय रुग्णालय तीन मजले असलेल्या शासकीय रुग्णालयात पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर रुग्णांना उपचारासाठी दाखल करण्यात येते. वृध्द व अत्यवस्थ रुग्णांना खाली वर नेण्या-आणण्यासाठी लिफ्टची आवश्यकता आहे. लिफ्ट बऱ्याच दिवसांपासून बंद आहे. बंद लिफ्टमध्ये भंगाराचे साहित्य ठेवण्यात आले आहे. उंच रॅम्पवरून स्ट्रेचरवरून ढकलत न्यावे लागते. मात्र रुग्णांना व्हीलचेअर किंवा स्ट्रेचरवरून न्यावे लागते. मात्र, स्ट्रेचर खराब आहेत. जुन्या स्ट्रेचरची चाके फिरत नाहीत. रुग्ण घेऊन जात असताना चाकांचा आवाज येतो. आंतररुग्ण विभागातून रुग्णाला बाह्यरुग्ण विभागापर्यंत जाण्या-येण्याचा रस्ताही खराब आहे. रस्त्यावर पावसाचे साचलेले पाणी असते. अशा परिस्थितीत रुग्णांना ने-आण करण्यासाठी नातेवाईकांना मोठी कसरत करावी लागते. रुग्णांना ने-आण करण्यासाठी लाखो रुपये खर्च करून वेगळा मार्ग बांधण्यात आला आहे. नवीन मार्गाचा वापर अद्याप बंद असून, त्याचा वापर रुग्णांच्या नातेवाईकांना जेवणासाठी व पाळीव कुत्री फिरण्यासाठी होत आहे. अपुरा कर्मचारी, तोडक्या, मोडक्या व्हीलचेअर्स, स्ट्रेचर्सची बंद चाके, बंद लिफ्ट यामुळे सर्व रुग्णांना व नातेवाईकांना सहन करावा लागतो. सिव्हिल प्रशासनाने याकडे लक्ष देऊन रुग्णांना आवश्यक सुविधा देण्याची मागणी आहे. (वार्ताहर)

Web Title: Miraj Civil lift stopped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.