मिरजेत औषध दुकान फोडून अडीच लाखांची राेकड लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:23 IST2021-04-05T04:23:44+5:302021-04-05T04:23:44+5:30

मिरजेत कशाळीकर हॉस्पिटलसमोर असलेले शांताई मेडिकल हे औषध दुकान शनिवारी पहाटे फोडून अज्ञात चोरट्यांनी ड्रॉवरमधील रोख दोन लाख एकोणसाठ ...

Miraj broke into a drug store and stole Rs 2.5 lakh | मिरजेत औषध दुकान फोडून अडीच लाखांची राेकड लंपास

मिरजेत औषध दुकान फोडून अडीच लाखांची राेकड लंपास

मिरजेत कशाळीकर हॉस्पिटलसमोर असलेले शांताई मेडिकल हे औषध दुकान शनिवारी पहाटे फोडून अज्ञात चोरट्यांनी ड्रॉवरमधील रोख दोन लाख एकोणसाठ हजार दोनशे रुपयांची रक्कम लंपास केली आहे. याबाबत औषध दुकान चालक सुहास गुजर यांनी गांधी चौक पोलिसांत तक्रार केली आहे. सुहास गुजर यांनी बँका बंद असल्यामुळे जमा झालेली रक्कम आपल्या मेडिकलच्या ड्रॉवरमध्ये ठेवली होती. शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर कटवणीने उचकडटून मेडिकलमध्ये प्रवेश केला. ड्रॉवर उचकटून त्यातील रोख रक्कम लंपास केली. चोरटा मेडिकलमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. त्याने आपला चेहरा बांधला असल्याचे सीसीटीव्हीत दिसत आहे. चोरटे हे चारचाकी वाहनांतून आले असल्याच्या संशय आहे. याबाबत महात्मा गांधी चौक पोलीस अधिक तपास करत आहेत.

Web Title: Miraj broke into a drug store and stole Rs 2.5 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.