शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारने पहिल्याच दिवशी डाव टाकला; मनोज जरांगे बच्चू कडूंच्या शेतकरी लढ्याच्या आंदोलनात सहभागी
2
श्रेयस अय्यरची दुखापत ठरली टीम इंडियासाठी मोठा धक्का, इतके महिने तो राहणार क्रिकेटपासून दूर
3
भयावह! अण्वस्त्रांच्या चाचणी युद्धाला तोंड फुटले; रशियाचे पाहून ट्रम्पनी पेंटागॉनला आदेश दिले...
4
सोन्याच्या वाढलेल्या दरांवर ग्रामपंचायतीने तोडगा काढला! महिलांना केवळ तीनच दागिन्यांची परवानगी, अन्यथा...
5
ऑनर किंलिंग प्रकरणात २० वर्षांची शिक्षा, तुरुंगातून सुटला, आता दोषी आरोपीचा अपघाती मृत्यू
6
तुमच्या पगारात किती महागडे घर खरेदी करावे? तज्ज्ञांनी सांगितले 'हे' ४ महत्त्वाचे नियम; EMI किती असावा?
7
पारंपरिक श्रद्धा, लोककला आणि आधुनिकतेचा संगम; ‘गोंधळ’च्या ट्रेलरने वाढवली उत्सुकता
8
तब्बल ६ वर्षांनंतर भेटले डोनाल्ड ट्रम्प अन् शी जिनपिंग; दक्षिण कोरियात चालली २ तासांची बैठक!
9
गंभीर दुखापतीनंतर श्रेयस अय्यरने पहिल्यांदाच केली सोशल मीडिया पोस्ट, दिली महत्त्वाची माहिती
10
२५ नोव्हेंबरला राम मंदिरात दर्शन बंद राहणार, PM मोदी अयोध्येला जाणार; ८ हजार निमंत्रणे गेली
11
Video - बापरे! ट्रेनमध्ये पर्स चोरीला गेली, महिला संतापली; एसी कोचच्या खिडकीची काच फोडली
12
एक सेल्फी घेतला अन् विषाची बाटली तोंडाला लावली! ३ वर्षांच्या बाळाच्या आई-वडिलांनी का उचललं टोकाचं पाऊल?
13
करदात्यांना मोठा दिलासा! ITR फाईल करण्याची अंतिम मुदत वाढवली; 'ही' आहे नवीन तारीख
14
ट्रम्प यांना मोठा झटका; त्यांच्याच पक्षाचे चार सिनेटर फिरले, कॅनडावरील अतिरिक्त १०% शुल्क लावण्याचा अधिकार काढून घेतला
15
November Astro 2025: नोव्हेंबरची सुरुवात अत्यंत शुभ; आदित्य राजयोगात 'या' ८ राशींचा भाग्योदय
16
IND W vs AUS W Semi Final Live:हीच ती वेळ! कांगारूंची शिकार करत टीम इंडियाच्या वाघीणीं फायनल गाठणार?
17
५ दिवस अशुभाची सावली, पंचक सुरू होणार शुक्रवारी; नेमके काय करावे अन् करू नये? पाहा, ५ नियम
18
बिहारमध्ये मोठा राडा! प्रचाराला आलेल्या तेजप्रताप यादवांवर दगडफेक; तेजस्वींच्या समर्थकांनी हुसकावून लावले
19
"माझ्या मुलीचं काय होईल?" जावयाने पाठवली घटस्फोटाची नोटीस, वडिलांचा हार्ट अटॅकने मृत्यू
20
अमेरिकेतील Rate Cut चा परिणामच नाही... उघडताच शेअर बाजारात मोठी घसरण; 'हे' स्टॉक्स आपटले

मिरज-बिकानेर साप्ताहिक एक्सप्रेस सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2024 19:10 IST

मिरज : मध्य रेल्वेच्या मिरज ते बिकानेर साप्ताहिक एक्सप्रेसचा (क्र. २०४७६) मंगळवारपासून मिरजेतून प्रारंभ झाला. मिरजेत भाजपचे नेते सुशांत ...

मिरज : मध्य रेल्वेच्यामिरज ते बिकानेर साप्ताहिक एक्सप्रेसचा (क्र. २०४७६) मंगळवारपासून मिरजेतून प्रारंभ झाला. मिरजेत भाजपचे नेते सुशांत खाडे, प्रभाकर पाटील व रेल्वे विभागीय सहायक व्यवस्थापक ब्रिजेशकुमार सिंग यांनी रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला. ही एक्सप्रेस मिरज स्थानकातून बिकानेरला रवाना झाली.मिरज ते बिकानेर एक्सप्रेसचा मिरजेपर्यंत विस्तार करण्यात आला असून प्रत्येक मंगळवारी ही गाडी मिरजेतून बिकानेरला जाणार आहे. मिरज-बिकानेर एक्सप्रेसचा विस्तार करण्यासाठी माजी खासदार संजय पाटील, पालकमंत्री सुरेश खाडे, रेल्वे कृती समितीचे अध्यक्ष मकरंद देशपांडे यांनी पाठपुरावा केला होता. ही एक्सप्रेस मिरजेतून दर मंगळवारी दुपारी २:२० वाजता, सांगलीतून दुपारी २:४० वाजता, किर्लोस्करवाडी येथून दुपारी ३ वाजता सुटेल.दुसऱ्या दिवशी बिकानेर येथे रात्री ८:४० वाजता पोहोचेल. या गाडीमुळे पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील प्रवाशांना राजस्थानला जाण्यासाठी थेट गाडी उपलब्ध झाली आहे. या गाडीचा मिरज-पुणे हा विशेष दर्जा काढून नियमित क्रमांकाने ही गाडी धावणार आहे. यामुळे तिकिटासाठी विशेष शुल्क आकारले जाणार नाही. त्यामुळे प्रवाशांच्या पैशाचीही बचत होणार आहे.मिरजेत उद्घाटनप्रसंगी रेल्वे कृती समितीचे उपाध्यक्ष गजेंद्र कल्लोळी, ओंकार शिखरे, ज्ञानेश्वर पोतदार, राजेश कुकरेजा, रेल्वे प्रवासी सेनेचे किशोर भोरावत, संदीप शिंदे व रेल्वे प्रवासी उपस्थित होते. आठवड्यातून एकदा धावणारी ही गाडी किमान तीन दिवस धावावी यासाठी रेल्वेकडे प्रस्ताव सादर करण्यात आल्याचे रेल्वे सल्लागार समिती सदस्य सुकुमार पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :Sangliसांगलीmiraj-acमिरजrailwayरेल्वे