मिरज-बेंगळुरू विशेष रेल्वे सुरू होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 04:24 IST2020-12-08T04:24:42+5:302020-12-08T04:24:42+5:30

हुबळी-लोकमान्य टिळक टर्मिनस दैनिक एक्स्प्रेस व लोकमान्य टिळक टर्मिनस-हुबळी एक्स्प्रेस ३१ डिसेंबरपर्यंत धावणार आहे. मिरज-बेंगळुरू उत्सव विशेष दैनिक ...

Miraj-Bengaluru special train will be started | मिरज-बेंगळुरू विशेष रेल्वे सुरू होणार

मिरज-बेंगळुरू विशेष रेल्वे सुरू होणार

हुबळी-लोकमान्य टिळक टर्मिनस दैनिक एक्स्प्रेस व लोकमान्य टिळक टर्मिनस-हुबळी एक्स्प्रेस ३१ डिसेंबरपर्यंत धावणार आहे. मिरज-बेंगळुरू उत्सव विशेष दैनिक एक्स्प्रेस ७ ते १७ डिसेंबरदरम्यान सुटेल. मिरज ते बेंगळुरू ८ ते १८ डिसेंबरपर्यत धावणार आहे. कोल्हापूर-बेंगळुरू एक्स्प्रेसप्रमाणे ही एक्स्प्रेस असेल. यशवंतपूर-जयपूर साप्ताहिक सुविधा महोत्सव विशेष एक्स्प्रेस यशवंतपूर ते जयपूर दर गुरुवारी १० डिसेंबर ते ३१ डिसेंबरपर्यत व जयपूर-यशवंतपूर साप्ताहिक सुविधा महोत्सव विशेष एक्स्प्रेस १२ ते २ डिसेंबर दरम्यान धावणार आहे.

जानेवारीपासून जयपूर ते यशवंतपूर एक्स्प्रेस प्रत्येक शनिवारी धावेल. बेंगळुरू-अजमेर साप्ताहिक विशेष एक्स्प्रेस ११ ते २५ डिसेंबरदरम्यान दर शुक्रवारी बेंगळुरूहून अजमेरला जाईल. अजमेर-बेंगळुरू साप्ताहिक स्पेशल एक्स्प्रेस १४ ते २८ डिसेंबरदरम्यान दर सोमवारी अजमेर ते बेंगळुरूला जाईल. बेंगळुरू-जोधपूर साप्ताहिक महोत्सव विशेष एक्स्प्रेस १३ ते २७ डिसेंबरदरम्यान दर रविवारी बेंगळुरूहून जोधपूरला जाईल. जोधपूर-बेंगळुरू साप्ताहिक विशेष एक्स्प्रेस १६ डिसेंबर ते ३० डिसेंबरदरम्यान दर बुधवारी धावेल.

Web Title: Miraj-Bengaluru special train will be started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.