मिरजेत तरुणाला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 05:11 IST2020-12-05T05:11:14+5:302020-12-05T05:11:14+5:30

तरुणाला मारहाण सांगली : येळदरी (ता. जत) येथील राजकुमार बाबू कोळी (वय ३५) या तरुणाला किरकोळ कारणावरून मारहाण करण्यात ...

Miraj beat the young man | मिरजेत तरुणाला मारहाण

मिरजेत तरुणाला मारहाण

तरुणाला मारहाण

सांगली : येळदरी (ता. जत) येथील राजकुमार बाबू कोळी (वय ३५) या तरुणाला किरकोळ कारणावरून मारहाण करण्यात आली. ही घटना गुरुवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. त्याला उपचारासाठी सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

------

तरुणाला विषबाधा

सांगली : कांचनपूर (ता. मिरज) येथील गणेश आनंदा मोहिते (वय २५) या तरुणाला विषबाधा झाली. ही घटना गुरुवारी रात्रीच्या सुमारास घडली. त्याला उपचारासाठी सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

------

दुचाकी धडकेत वृद्ध जखमी

सांगली : दुचाकीच्या धडकेत बाबूराव जगू सरगर (वय ८०) हे जखमी झाले. ही घटना गुरुवारी सायंकाळी साडेपाचच्यासुमारास घडली. त्यांना उपचारासाठी सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिरजेत एकास मारहाण

सांगली : किरकोळ कारणावरून सलीम अब्दुलवहाब शेख (वय ४५) या तरुणाला दोघांनी मारहाण करून जखमी केले. ही घटना गुरुवारी रात्री सातच्या सुमारास घडली. त्यांना उपचारासाठी सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Web Title: Miraj beat the young man