दारूसाठी पैसे न दिल्याने मिरजेत कोयत्याने तरुणावर हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 05:07 IST2020-12-05T05:07:50+5:302020-12-05T05:07:50+5:30
मिरज माणिकनगर रेल्वे कर्मचारी वसाहतीत मारुती मंदिराजवळ गुरुवारी सायंकाळी कट्ट्यावर बसलेल्या समीर शेख याच्या डोक्यावर पाच ते सहाजणांच्या ...

दारूसाठी पैसे न दिल्याने मिरजेत कोयत्याने तरुणावर हल्ला
मिरज माणिकनगर रेल्वे कर्मचारी वसाहतीत मारुती मंदिराजवळ गुरुवारी सायंकाळी कट्ट्यावर बसलेल्या समीर शेख याच्या डोक्यावर पाच ते सहाजणांच्या टोळीने कोयत्याने वार केले. हल्ल्यात समीर शेख यांच्या डोक्याला गंभीर इजा झाल्याने त्यास रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
समीर शेख वाहनचालक म्हणून काम करतो. त्याची पत्नी रेल्वे कर्मचारी आहे. माणिकनगर परिसरात गुंडगिरी करणारे मोजस भंडारी, शौकत शेख हे समीर याच्याकडे दरमहा पाच हजार रुपये खंडणी मागत होते. ती देण्यास समीर याने नकार दिला होता. गुरुवारी समीर चाैकात बसला असताना भंडारी व शेख यांनी त्याच्याकडे दारूसाठी पैशाची मागणी केली. समीरने पैसे देण्यास नकार दिल्याने शौकत शेख, मोजेस भंडारी , भागराज दारला ,प्रथमेश संकपाळ व त्यांच्या अन्य साथीदारांनी समीर शेख याच्यावर कोयत्याने वार करून पलायन केले. याबाबत जखमी समीर शेख यांने गांधी चाैक पोलिसात फिर्याद दिली असून, आरोपीविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील मोजेस भंडारी हा पोलिसांच्या रेकाॅर्डवरील गुन्हेगार आहे. या घटनेमुळे माणिकनगर रेल्वे कर्मचारी वसाहतीत खळबळ उडाली होती.
फोटो-०३समीर शेख