शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

पेठ-सांगली रस्त्याच्या कामात गडबड करणाऱ्यांची खैर नाही, मंत्री नितीन गडकरींनी दिला इशारा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2023 14:10 IST

आष्टा : इथेनॉल भविष्यातील इंधन असून उसाच्या रसापासून थेट इथेनॉल निर्मितीसाठी साखर कारखान्यांनी पुढे  यावे, असे आवाहन केंद्रीय रस्ते ...

आष्टा : इथेनॉल भविष्यातील इंधन असून उसाच्या रसापासून थेट इथेनॉल निर्मितीसाठी साखर कारखान्यांनी पुढे  यावे, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्गमंत्रीनितीन गडकरी यांनी शुक्रवारी केले. पेठ नाका ते सांगली रस्त्याच्या चौपदरीकरणाचे भूमिपूजन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. हे काम महिन्यात सुरू हाेईल. रस्त्याच्या कामात गडबड करणाऱ्यांची खैर नाही, असा इशारा त्यांनी दिला.आष्टा येथे झालेल्या कार्यक्रमास पालकमंत्री सुरेश खाडे, खासदार संजय पाटील व धैर्यशील माने, आ. जयंत पाटील, सुधीर गाडगीळ, मानसिंगराव नाईक, विश्वजीत कदम, सुमनताई पाटील, विक्रम सावंत, गोपीचंद पडळकर, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी उपस्थित होते. गडकरी म्हणाले, उसाच्या रसापासून थेट इथेनॉल निर्मिती झाल्यास त्याचा लाभ साखर कारखान्यांसह शेतकऱ्यांना होणार आहे. इथेनॉलसह हायड्रोजनही भविष्यातील इंधन असून त्याच्या निर्मितीसाठीही शेतकऱ्यांनी पुढे यावे.गडकरी म्हणाले, पेठ-सांगली या रस्त्याचे काम एक महिन्यात सुरू होणार आहे  बदलत्या तंत्रज्ञानाचा अवलंब करून या रस्त्याची बांधणी करण्यात येणार आहे. या भागातील शैक्षणिक संस्थांनी दुतर्फा झाडी लावून हा रस्ता ग्रीन हायवे करावा.पालकमंत्री खाडे म्हणाले, मार्चनंतर या रस्त्याच्या कामाला सुरुवात होऊन दर्जेदार रस्ता  होईल.या रस्त्यामुळे भागातील गावे राष्ट्रीय महामार्गाच्या नकाशावर आल्याने या परिसराचा विकास होईल, असे खासदार पाटील म्हणाले.  राष्ट्रीय महामार्गचे मुख्य अभियंता संतोष शेलार यांनी प्रास्ताविक केले.

असा असणार रस्ता    

  • पेठ नाका ते सांगली हा ४१.२५ किलोमीटरचा रस्ता ईपीसी तत्त्वावर काँक्रिट चौपदरीकरण करून पुनर्बांधणी.
  • ८६० कोटी ४५ लाख रुपये मंजूर.
  • चारपदरी काँक्रिट रस्ता, मध्यभागी ०.६ मीटरचा दुभाजक, दुभाजकापासून दोन्ही बाजूस ७.५ मीटर रुंदीचा काँक्रिट रस्ता व १.५  मीटर रुंदीची बाजू पट्टी. 
  • रस्त्यावर १० छोटे पूल, १५ बॉक्स सेल मोरी, ६० पाइप मोरी, दोन ट्रक थांबे, दहा बस शेड, सहा मोठे जंक्शन, ३४ लहान जंक्शन, एक टोल नाका एक (तुंग ते कसबे डिग्रज दरम्यान), काँक्रिट गटार १४.२०४ कि.मी. दोन्ही बाजूस, खुली गटार २७.०४६ कि.मी. दोन्ही बाजूस.
टॅग्स :Sangliसांगलीhighwayमहामार्गNitin Gadkariनितीन गडकरी