राज्यातील मिनी अंगणवाड्यांचे अंगणवाडीमध्ये रूपांतर करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:24 IST2021-01-18T04:24:26+5:302021-01-18T04:24:26+5:30
सांगली : मिनी अंगणवाड्यांचे अंगणवाडीत रूपांतर करण्यासाठी एकात्मिक बालविकास सेवा योजना विभागाने माहिती मागविली आहे. राज्यात सुमारे १२ हजार ...

राज्यातील मिनी अंगणवाड्यांचे अंगणवाडीमध्ये रूपांतर करणार
सांगली : मिनी अंगणवाड्यांचे अंगणवाडीत रूपांतर करण्यासाठी एकात्मिक बालविकास सेवा योजना विभागाने माहिती मागविली आहे.
राज्यात सुमारे १२ हजार २९५ मिनी अंगणवाडी केंद्रे आहेत. त्यांचे रूपांतर अंगणवाडीत करण्यासाठी लोकसंख्येनुसार शासनाने सुधारित निकष निश्चित केले आहेत. त्यानुसार १५० ते ४०० लोकवस्तीसाठी मिनी अंगणवाडी केंद्र मंजूर केले जाते. ४०० ते २४०० लोकसंख्येसाठी अंगणवाडी मंजूर केली जाते. राज्यात अनेक ठिकाणी लोकसंख्या वाढली तरी तेथे मिनी अंगणवाड्याच कायम आहेत. त्यांचे रूपांतर नियमित अंगणवाडीमध्ये करण्यासाठी अंगणवाडी कर्मचारी महासभा तसेच संघटना पाठपुरावा करत होत्या. शासन व आयुक्त स्तरावर कृती समिती प्रयत्न करत होती. एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तांनी डिसेंबरमध्ये जिल्हा प्रशासनाला आदेश काढून अंगणवाड्यांची माहिती मागविली आहे.
मिनी अंगणवाडी सुरू करतेवेळी लोकसंख्या किती होती व आता किती आहे हे कळविण्यास सांगितले आहे. आयुक्तालयाच्या पोर्टलवर २२ जानेवारीपर्यंत ही माहिती कळवायची आहे.
--------