कृष्णा कारखान्याचे मिल रोलर पूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:27 IST2021-07-27T04:27:50+5:302021-07-27T04:27:50+5:30
शिरटे : यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्यामध्ये २०२१-२२ या गळीत हंगामासाठी मिल रोलरचे पूजन अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले ...

कृष्णा कारखान्याचे मिल रोलर पूजन
शिरटे : यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्यामध्ये २०२१-२२ या गळीत हंगामासाठी मिल रोलरचे पूजन अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कृष्णा सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले, कारखान्याचे उपाध्यक्ष जगदीश जगताप आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले व उपाध्यक्ष जगदीश जगताप यांच्या हस्ते मिल रोलरचे पूजन करण्यात आले. त्यानंतर त्यांच्या हस्ते यांत्रिक कळ दाबून रोलर बसविण्याच्या कामाला प्रारंभ करण्यात आला.
यावेळी संचालक दयानंद पाटील, धोंडीराम जाधव, संजय पाटील, बाबासाहेब शिंदे, संभाजीराव पाटील, शिवाजी पाटील, जयवंत मोरे, वसंतराव शिंदे, बहेचे माजी उपसरपंच मनोज पाटील, वैभव जाखले, कार्यकारी संचालक सूर्यकांत दळवी, पै. जयकर कदम, सचिव मुकेश पवार, जनरल मॅनेजर (टेक्निकल) प्रसाद राक्षे, प्रोसेस मॅनेजर डी. जी. देसाई, चीफ इंजिनिअर सुहास घोरपडे, असिस्टंट जनरल मॅनेजर (डिस्टलरी) प्रतापसिंह नलवडे, मुख्य शेती अधिकारी प्रकाश सूर्यवंशी, ऊस विकास अधिकारी पंकज पाटील, ई. डी. पी. मॅनेजर अवधूत रेणावीकर, लेबर अँड वेल्फेअर ऑफिसर अरुण पाटील उपस्थित होते.
फोटो
: २६ शिरटे १
ओळ : रेठरे बुद्रुक (ता. कऱ्हाड) येथील कृष्णा कारखाना कार्यस्थळावर डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते मिल रोलरचे पूजन करण्यात आले. यावेळी डॉ. अतुल भोसले, उपाध्यक्ष जगदीश जगताप, संभाजी पाटील, संजय पाटील उपस्थित होते.