शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात दूध दरात तफावत, गाय दूध खरेदी दरात सांगली पिछाडीवर; दूध उत्पादकांमध्ये नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2026 18:43 IST

दरवाढ मिळणे अपेक्षित

अतुल जाधव

देवराष्ट्रे : आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत दूध व दुग्धजन्य पदार्थांच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ असल्यामुळे यावर्षी दुधाला चांगला भाव प्राप्त झाला आहे. मात्र, राज्यातच दूध दरात मोठ्या प्रमाणात तफावत आढळून येत आहे. सध्या पुणे जिल्ह्यात गाय दूध खरेदी दर ३८ रुपये तर सांगली जिल्ह्यात मात्र तोच दर ३५ रुपये शेतकऱ्यांना मिळत आहे. त्यामुळे दूध उत्पादकांतून नाराजी व्यक्त केली जात आहे.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!चारा खाद्य, पाणी, मजूर यांचा खर्च वाढत चालला आहे. तरीदेखील दहा दिवसाला मिळणारे उत्पन्न म्हणून नवनवीन तरुण या व्यवसायाकडे वळू लागले आहे. तसेच गुंतवणूकही मोठ्या प्रमाणात करू लागला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारभावाची तुलना जिल्ह्यात करू लागला आहे. त्यामुळे कोणत्या जिल्ह्यात किती दर मिळतो, त्याची माहिती शेतकऱ्यांना लगेच उपलब्ध होत आहे. यामुळेच आता राज्यांमध्ये पुणे, अहिल्यानगर हे दोन जिल्हे दूध दर देण्यामध्ये अव्वल ठरले आहेत. इतर जिल्ह्यांत त्या मानाने थोडाफार दराचा फायदा मिळत आहे. मात्र सांगली जिल्ह्यामध्ये प्रतिलिटर तीन रुपये खरेदी कमी दराने घेतला जात आहे. त्यामुळे दूध उत्पादकांमध्ये नाराजीचा सुरू आहे.

दरवाढीला बगलजिल्ह्यात दूध संकलन करणाऱ्या अन्य राज्यांतील दूध संघांनी दूध दर ३८ ते ३९ रुपये प्रतिलिटर केला आहे. मात्र, स्थानिक दूध संघ व खासगी दूध संघाने या दरवाढीला बगल देत जुन्याच दराने म्हणजे ३५ रुपये दराने दूध खरेदी चालू ठेवले आहे.

दरवाढ मिळणे अपेक्षितमहागाई वाढत चालली आहे. त्या प्रमाणात दुधाला दरवाढ मिळणे अपेक्षित आहे. मात्र, तरीसुद्धा इतर जिल्ह्यांच्या मानाने आपल्या जिल्ह्यात गाय व म्हैस दुधाच्या खरेदी दरात ३ ते ४ रुपयांनी कमी आहे. नेहमी दूध दरात अग्रेसर असणारा जिल्हा मागे का पडत आहे. याबाबत चिंतन करण्याची गरज निर्माण झाली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Milk Price Disparity: Sangli Farmers Upset Over Low Procurement Rates

Web Summary : Sangli milk producers are unhappy as they receive ₹35 per liter, while Pune farmers get ₹38. Despite rising costs and international demand, local dairies haven't increased prices like those in other states, causing concern and calls for fair pricing.