पूरस्थितीपूर्वी स्थलांतर करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:19 IST2021-06-22T04:19:33+5:302021-06-22T04:19:33+5:30

--------- रेशनवरील धान्याची प्रतीक्षा सांगली : शासनाने प्राधान्य कुटुंब व अंत्योदयमधील कुटुंबांना रेशनिंगचे धान्य देण्यात आले. त्यानंतर शासनाकडून केसरी ...

Migration should be done before the precedent | पूरस्थितीपूर्वी स्थलांतर करावे

पूरस्थितीपूर्वी स्थलांतर करावे

---------

रेशनवरील धान्याची प्रतीक्षा

सांगली : शासनाने प्राधान्य कुटुंब व अंत्योदयमधील कुटुंबांना रेशनिंगचे धान्य देण्यात आले. त्यानंतर शासनाकडून केसरी कार्डधारकांनी धान्य देण्याची घोषणा झाली. पण अद्याप या धान्याचे वाटप सुरू झालेले नाही. त्यामुळे केसरी कार्डधारकांत नाराजी आहे.

-------

कारखाना परिसरात गढूळ पाणी

सांगली : शहरातील साखर कारखाना, शांतिनिकेतन, लक्ष्मीनगर परिसरात काही दिवसांपासून गढूळ पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. महापालिकेने तातडीने शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्याची मागणी होत आहे.

----------

शहरात पुन्हा गर्दी

सांगली : कोरोनाची रुग्णसंख्या स्थिर असताना शहरात मात्र रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. सोमवारी दुपारच्या वेळी राजवाडा चौक, महापालिका चौकात मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी होती. कोरोना नियमांचेही उल्लंघन होत होते.

Web Title: Migration should be done before the precedent