शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
2
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
4
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
5
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
6
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
7
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
8
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
9
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
10
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
11
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
12
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
13
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
14
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
15
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
16
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
17
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
18
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
19
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
20
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप

महापुराने पक्ष्यांचे स्थलांतर विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2019 5:28 AM

ऑगस्टमध्ये आलेल्या महापुराचा फटका पक्ष्यांच्या जीवनचक्रालाही बसला आहे.

संतोष भिसे सांगली : ऑगस्टमध्ये आलेल्या महापुराचा फटका पक्ष्यांच्या जीवनचक्रालाही बसला आहे. पाणी पात्राबाहेर पडल्याने तसेच नदीचा फुगवटा व पाण्याचा वेग जास्त राहिल्याने पक्ष्यांना खाद्य स्वरूपात कृमी-कीटक मिळत नसल्याने पक्षी नदीपासून दुरावले. उभी पिके नष्ट झाली तसेच पेरण्या लांबल्याने पक्ष्यांचे स्थलांतर विस्कळीत झाले आहे.जिल्ह्यात ४० हून अधिक प्रजातीचे पक्षी सैबेरिया, लडाख, उत्तर भारतासह युरोपातील कडाक्याच्या थंडीपासून बचावासाठी येथे येतात. चक्रवाकसह अनेक प्रजातींचे बदक, पाणपक्षी, तुतवार, सॅण्डपाईपर, शांक असे पक्षी जिल्ह्याचा पाहुणचार घेतात. संपूर्ण कृष्णाकाठ, सागरेश्वर अभयारण्य, दंडोबा व गिरलिंग डोंगररांगा, मायणीजवळचा येरळवाडी तलाव, चांदोली, आटपाडी व भोसे तलाव, देशिंग-खरशिंगची माळराने, खंडेराजुरीतील ब्रम्हनाथ देवालयाचा परिसर येथे फेब्रुवारी-मार्चपर्यंत मुक्काम करतात. आॅक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून त्यांचे आगमन सुरू होते. नोव्हेंबरमध्ये वेळू वटवट्या सांगलीत दिसू लागतो. यंदा महापुरात किनाऱ्यांसोबत दलदलीच्या पारंपरिक जागाही वाहून गेल्या. त्यामुळे अन्यत्र नव्याने निर्माण झालेल्या पाणथळ जागा व दलदलींकडे पक्ष्यांना वळावे लागले. एकूणच त्यांचे स्थलांतराचे चक्र विस्कळीत झाल्याचे पहायला मिळत आहे.>सांगलीत येणारे पक्षीवेळू वटवट्या, चक्रवाकसह अनेक प्रजातींचे बदक, रंगीत करकोचे, अग्निपंख (फ्लेमिंगो), असंख्य पाणपक्षी, तुतवार, सॅण्डपाईपर, शांक आदी.>‘वेळू वटवट्या’अजूनही दिसला नाही...पक्षीप्रेमींना यंदा पक्ष्यांची प्रतीक्षा करावी लागत आहे. नोव्हेंबर उजाडला तरी, सांगली परिसरात मोठ्या संख्येने पक्ष्यांचे दशर््ान नाही.एरवी नोव्हेंबरच्या पहिल्याच आठवड्यात येणारा वेळू वटवट्या अजूनही दिसलेला नाही. पावसाळा लांबल्याने व रानात पिके नसल्याने खाद्यान्नाचा तुटवडा भासत आहे. दुसरीकडे अनेक नव्या दलदलीच्या जागा निर्माण झाल्याचा फायदाही होत आहे. त्यामुळे ते विखुरले आहेत.- शरद आपटे, पक्षी अभ्यासक