शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
3
आंध्र प्रदेशातील ग्रॅनाइट खाणीत मोठी दुर्घटना, ६ स्थलांतरित कामगारांचा मृत्यू, ३ जखमी
4
सुरक्षित गुंतवणुकीसह जबरदस्त रिटर्न! कमाईची उत्तम संधी आहेत या ५ स्कीम; मिळेल ८% पेक्षा जास्त व्याज
5
मनसे, उद्धवसेना, शेकाप, राष्ट्रवादी एकत्र आले म्हणजे..?
6
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
7
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
8
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
9
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
10
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
11
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
12
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
13
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
14
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
15
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
16
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
17
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
18
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
19
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
20
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले

त्यावेळची शिवसेना आणि आताच्या शिवसेनेत जमीन-आसमानाचा फरक : नारायण राणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2017 08:39 IST

राज्यात मध्यावधी निवडणुकांची शक्यता नाकारता येत नाही. लोकसभा व विधानसभा निवडणुका एकाचवेळी होण्याचीही चिन्हे आहेत. सर्वच पक्षांचे दिग्गज नेते महाराष्ट्रात दौरे करीत आहेत. त्यांची तयारी तेवढ्यासाठी असू शकते.

ठळक मुद्देस्वभाव बदलणार नाही!माझी फसवणूक होणार नाही...दिवाकर रावते सर्वात निष्क्रीय मंत्रीपन्नास टक्के पाप शिवसेनेचेगुजरातमध्ये भाजपच सत्तेवर येणार

सांगली : राज्यात मध्यावधी निवडणुकांची शक्यता नाकारता येत नाही. लोकसभा व विधानसभा निवडणुका एकाचवेळी होण्याचीही चिन्हे आहेत. सर्वच पक्षांचे दिग्गज नेते महाराष्ट्रात दौरे करीत आहेत. त्यांची तयारी तेवढ्यासाठी असू शकते. आम्हीही आमच्या पक्षीय दौऱ्याची तयारी मध्यावधीची शक्यता गृहीत धरूनच करीत आहोत, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री व महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी शनिवारी सांगलीत पत्रकार परिषदेत केले .ते म्हणाले की, बाळासाहेबांना कोणत्याही प्रकारचे दु:ख मी दिले नाही. याऊलट मातोश्रीवर त्या काळात काय काय घडले हे मी माज्या डोळ््यांनी पाहिले आहे. उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांनी बाळासाहेबांना प्रचंड त्रास दिला. मी काम करीत होतो त्यावेळची शिवसेना आणि आताच्या शिवसेनेत जमीन-आसमानाचा फरक आहे.

सध्याच्या शिवसेनेत ५ टक्केही प्राण राहिला नाही. तत्व आणि शब्दाप्रमाणे चालणारी शिवसेना आता तशी अजिबात दिसत नाही. सत्तेचा लाभ घेऊन केवळ पोकळ इशारे देत उद्धव ठाकरे फिरत आहेत. त्यांच्या बोलण्यात कोणताही दम नाही. काय आणि कधी बोलावे हे कळण्याइतपत त्यांना राजकारणाचा गंधही नाही. शिवसेनेबरोबरच आता कॉंग्रेसचेही अस्तित्व संपल्यात जमा आहे. त्यांची सध्याची दशा पाहिली तर पक्ष दिशाहीन झाल्याचे स्पष्ट दिसून येते. मुख्यमंत्रीपदासाठी तीनवेळा कॉंग्रेसने आश्वासन देऊन विमानाने मला दिल्लीला नेले. शब्द मला देऊन इतरांनाच मुख्यमंत्री केले. या गोष्टी मला रुचल्या नाहीत. आजवर कधी पदांच्या अपेक्षेने काम केले नाही, मला माझ्या मेरिटवरच पदे मिळत गेली आहेत. त्यामुळे यापुढेही अशाच पद्धतीने काम करेन.राज्यातील सत्ताधाऱ्यांना पाठींबा देण्यामागचा माझा उद्देश स्पष्ट आहे. लोकांचे प्रश्न सोडवायचे असतील तर सरकारबरोबर रहावे लागते. विरोधात राहून कामे होणे कठीण असते. शिवसेना मात्र सत्तेत राहून गेल्या काही वर्षातकोणत्याही घटकाचे प्रश्न सोडविण्यात यशस्वी झाली नाही.

पक्षीय दौरा करताना मला शेतकरी, व्यापारी, उद्योजक व सामान्य जनतेचे प्रश्न जाणवतात. शासनाने त्यांच्या धोरणात काही बदल केले तर निश्चितपणे ही परिस्थिती बदलू शकते. सरकारबद्दलची नाराजी असली तरी प्रमाणापेक्षा ती जास्त पसरविली जात आहे. पक्ष म्हणून आम्ही असे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करू.शिवसेनेकडूनही होती आॅफरपरखड स्वभावामुळे माझे नुकसान झाले, असे मी समजत नाही. कारण आजवर मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते किंवा अन्य कोणतीही पदे मिळाली ती माझ्या स्वभावामुळेच मिळाली. आजही सर्वच पक्षांकडून मला आॅफर मिळतआहेत.शिवसेनेकडूनही वर्षभरापूर्वी मला पक्षात येण्यासाठी आॅफर होती, मात्र मी ती नाकारली.  त्यामुळे स्वभावात फरक करणार नाही. मी जसा आहे तसाच राहणार, असे राणे म्हणाले.

माझी फसवणूक होणार नाही...कॉंग्रेसने वारंवार मुख्यमंत्रीपदाचा शब्द देऊन फसविले असले तरी भविष्यात भाजप किंवा अन्य कोणी मला फसवेल, असे वाटत नाही. मी फसणारा माणूस नाही, असे राणे म्हणाले.दिवाकर रावते सर्वात निष्क्रीय मंत्रीपराभूत झालेल्या लोकांना विधानपरिषदेवर घेऊन शिवसेनेने त्यांच्या गळ््यात मंत्रीपदाची माळ घातली. प्रत्यक्षात दिवाकर रावतेहे अत्यंत निष्क्रीय मंत्री मंत्री निघाले. तीन वर्षात यांना एकही काम करता आले नाही, अशी टीका राणे यांनी केली.पन्नास टक्के पाप शिवसेनेचेराज्यातील शेतकरी व सर्वसामान्य लोकांचे प्रश्न दूर झाले नाहीत.त्यांच्यासमोरील अडचणी वाढल्या आहेत. यातील पन्नास टक्के पाप हे शिवसेनेचे आहे, असा आरोप राणे यांनी केला.गुजरातमध्ये भाजपच सत्तेवर येणारगुजरात विधानसभेत चूरस असली तरी भाजपचीच सत्ता येईल, असे भाकीत राणे यांनी येथे केले.

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे SangliसांगलीShiv Senaशिवसेना