कुटुंबातील कोणीही 'स्मार्ट कार्ड' घ्या आणि एसटीने प्रवास करा- दिवाकर रावते

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2017 04:10 PM2017-12-06T16:10:53+5:302017-12-06T16:11:12+5:30

'कॅशलेस स्मार्ट कार्ड' योजना लवकरच एसटीच्या प्रवाशांना उपलब्ध करून देणार असल्याची घोषणा परिवहन व खारभूमी विकास मंत्री तथा, एसटी महामंडळाचे अध्यक्ष, दिवाकर रावते यांनी केली आहे.

Take a 'smart card' from the family and travel by ST - Diwakar says | कुटुंबातील कोणीही 'स्मार्ट कार्ड' घ्या आणि एसटीने प्रवास करा- दिवाकर रावते

कुटुंबातील कोणीही 'स्मार्ट कार्ड' घ्या आणि एसटीने प्रवास करा- दिवाकर रावते

Next

मुंबईः विशिष्ट रक्कम भरून घेतलेले स्मार्ट कार्ड आपल्या बरोबरच कुटुंबातील व्यक्ती व इतरांनाही प्रवासासाठी वापरता येईल, अशी सुविधा देणारी 'कॅशलेस स्मार्ट कार्ड' योजना लवकरच एसटीच्या प्रवाशांना उपलब्ध करून देणार असल्याची घोषणा परिवहन व खारभूमी विकास मंत्री तथा, एसटी महामंडळाचे अध्यक्ष, दिवाकर रावते यांनी केली आहे.

या योजनेंतर्गत प्रवाशांना रु.50/- चे स्मार्ट कार्ड घेऊन त्यावर सुरुवातीला किमान रु.500/- इतकी रक्कम भरणे आवश्यक आहे. त्यानंतर पुनर्भरणा रक्कम ही रु.100/- च्या पटीत असेल. या योजनेचा लाभ प्रवाशांना येत्या महाराष्ट्र दिनापासून (1 मे, 2018) प्रत्येक आगारात जाऊन घेता येईल. एसटीच्या प्रवासाला निघाले की, सुट्टे पैसे आहेत का? नेमके पैसे द्या, किती जणांना मी मोड देऊ! असे वाहकाचे नानाविध प्रश्न डोळ्यांसमोर उभे राहतात.

या सर्वातून प्रवाशांची सुटका करण्यासाठी एसटी महामंडळाने स्मार्ट कार्ड योजना आणली आहे. त्यानुसार ठरावीक रकमेचे स्मार्ट कार्ड घेऊन त्याद्वारे त्या रकमेइतका एसटीचा कोणताही (साधी, रातराणी, हिरकणी, शिवशाही, शिवनेरी व अश्वमेध बसेस) प्रवास करणे आता प्रवाशांना शक्य होणार आहे. त्यामुळे खिशात सुट्टे पैसे आहेत की नाहीत, याची चिंता करण्याची गरज नाही. विशेष म्हणजे हे स्मार्ट कार्ड एका व्यक्तीने काढले तरी त्याच्या कुटुंबातील व मित्रांपैकी कोणीही प्रवासाला जाताना हे कार्ड वापरू शकतात. तसेच कितीही व्यक्तींची तिकिटे काढू शकतात.

अर्थात प्रत्येक व्यक्तीने जितका प्रवास केला तितके पैसे त्या कार्डमधून वजा होत राहतील. हे कार्ड नंतर पुनर्भरणा (रिचार्ज) करण्याची सुध्दा सोय असून, घरबसल्या देखील ऑनलाईन रक्कम या कार्डवर भरणा केली जावू शकते. सहाजिकच या स्मार्ट कार्ड मुळे प्रवाशांचा प्रवास सुखकर तर होईलच, शिवाय सुट्ट्या पैशावरून वाहक व प्रवासी यांच्यातील हमरी-तुमरी व अनावश्यक वाद-विवाद देखील टाळले जाऊ शकतात.

Web Title: Take a 'smart card' from the family and travel by ST - Diwakar says

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.