शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

म्हैसाळ हत्याकांड : मांत्रिकाचा साथीदार धीरज सुरवशेंच्या कोठडीत वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2022 17:14 IST

बागवान याचा साथीदार धीरज चंद्रकांत सुरवशे (सोलापूर) याच्या पोलीस कोठडीत चार दिवसांची वाढ

सांगली : म्हैसाळ (ता. मिरज) येथील हत्याकांड प्रकरणात मांत्रिक अब्बास बागवान याचा साथीदार धीरज चंद्रकांत सुरवशे (सोलापूर) याच्या पोलीस कोठडीत चार दिवसांची वाढ करण्यात आली. या प्रकरणी मांत्रिकाच्या बहिणीचा शोध सुरू आहे.अधिक माहिती अशी, की डॉ. माणिक आणि पोपट वनमोरे यांना गुप्तधन शोधण्याचा नाद लागला होता. सोलापूर येथील मांत्रिक अब्बास बागवान याने ते शोधून देतो,’ असे सांगून वेळोवेळी त्याने पैसे उकळले होते. अखेर गुप्तधन मिळत नसल्याने वनमोरे यांनी पैशांसाठी तगादा लावला होता. त्यावेळी मांत्रिकाने सुरवशेच्या मदतीने कुटुंबाचा काटा काढण्याचे ठरविले.मांत्रिक बागवान व त्याचा चालक धीरज सुरवसे १९ जूनला सोलापूरमधून म्हैसाळला आले. रात्री नऊच्या सुमारास डॉ. माणिक यांच्या घरी दोघांनी जेवण केले. डॉक्टर दाम्पत्यास अकराशे गहू काढून दिले. ते सात वेळा मोजण्यास सांगितले. त्यावेळी विषाच्या गोळ्या मांत्रिकाने आणल्या होत्या. रात्री एकच्या सुमारास पोपट वनमोरे यांचे कुटुंब संपविले. त्यानंतर पहाटे चारच्या सुमारास डॉ. माणिक यांचे कुटुंब संपवून मांत्रिक आणि साथीदार पसार झाले होते.त्यानंतर दोघांना अटक करण्यात आली. सुरवशे याच्या पोलीस कोठडीची मुदत गुरुवारी संपली. त्याला पुन्हा न्यायालयासमोर हजर केले. त्यावेळी त्याला ११ जुलैपर्यंत वाढीव कोठडी देण्यात आली आहे. दरम्यान, मांत्रिकाच्या बहिणीचा शोध सुरू आहे. पोलीस उपाधीक्षक अशोक वीरकर व स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पथक तपास करीत आहे.

टॅग्स :Sangliसांगली