सोनवडेत कृपासिंधू ट्रस्टतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:26 IST2021-09-19T04:26:19+5:302021-09-19T04:26:19+5:30
वारणावती : विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात शिक्षणाचा पाया पक्का करावा. शिक्षक सोप्या सोप्या क्लृप्त्या वापरून शिकविण्याचे काम करतात. त्या आत्मसात ...

सोनवडेत कृपासिंधू ट्रस्टतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
वारणावती : विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात शिक्षणाचा पाया पक्का करावा. शिक्षक सोप्या सोप्या क्लृप्त्या वापरून शिकविण्याचे काम करतात. त्या आत्मसात केल्यास यश मिळेल, असे प्रतिपादन डोंबिवलीच्या कृपासिंधू ट्रस्टचे विश्वस्त अध्यक्ष मारुती शिरसट यांनी केले.
सोनवडे (ता. शिराळा) येथील हुतात्मा नानकसिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कृपासिंधू ट्रस्टच्या वतीने ८० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवून यशस्वी झालेल्या दहावी व बारावीतील मुलांच्या सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. पर्यवेक्षक एस. टी. पाटील अध्यक्षस्थानी होते.
किरण शिंदे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी कृपासिंधू ट्रस्टचे सचिव योगेश खटिंग, विश्वस्त युवकांत शिरसट, वंदना ठोंबरे, सुरेश साठे, शशिकांत गुरव, संदीप अडिसरे, गंगाराम पाटील, आदी उपस्थित होते.
180921\img-20210917-wa0004.jpg
सोनवडेत नानकसिंग विद्यालयातील मुलांच्या सत्कार कार्यक्रम छाया-गंगाराम पाटील