तुंग हायस्कूलमध्ये गुणवंतांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:28 IST2021-09-18T04:28:20+5:302021-09-18T04:28:20+5:30
कसबे डिग्रज : तुंग (ता. मिरज) येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये १४ सप्टेंबर हिंदी दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी ...

तुंग हायस्कूलमध्ये गुणवंतांचा सत्कार
कसबे डिग्रज : तुंग (ता. मिरज) येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये १४ सप्टेंबर हिंदी दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी तंटामुक्त ग्राम समितीचे अध्यक्ष धनाजी भानुसे, राज्यसेवा परीक्षेतील यशाबद्दल आकाश बावडेकर, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठामध्ये द्वितीय व कॉलेज ऑफ फॉरेस्टमध्ये प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल स्वप्नाली पाटील यांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष वैभव शिंदे यांच्याहस्ते करण्यात आला.
याप्रसंगी वैभव शिंदे म्हणाले, विद्यार्थीदशेपासून मुलांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करावा. स्पर्धेचे महत्त्व समजून घेऊन तयारी करावी. आपले नाव, आपल्या कुटुंबाचे नाव, शाळेचे नाव, गावाचे नाव उज्ज्वल करावे. याप्रसंगी भास्कर पाटील, मुख्याध्यापक भगवान बोते, ग्रामपंचायत सदस्य विलास डांगे, भगवानराव कदम, सुधीर गोंधळी, दिलीप भानुसे, एकनाथ कापसे, रमेश करे उपस्थित होते.