जिल्ह्याचा पारा गेला ३९ अंशांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 04:15 IST2021-03-30T04:15:59+5:302021-03-30T04:15:59+5:30
सांगली : जिल्ह्याच्या तापमानात गेल्या दोन दिवसांत मोठी वाढ झाली असून, कमाल तापमान ३९ अंशांवर गेल्याने नागरिकांना उन्हाच्या तीव्र ...

जिल्ह्याचा पारा गेला ३९ अंशांवर
सांगली : जिल्ह्याच्या तापमानात गेल्या दोन दिवसांत मोठी वाढ झाली असून, कमाल तापमान ३९ अंशांवर गेल्याने नागरिकांना उन्हाच्या तीव्र झळांचा सामना करावा लागत आहे. किमान तापमानही २३ अंशांवर गेल्याने रात्रीच्या उकाड्यात भर पडली आहे.
जिल्ह्यात गत आठवड्यात कमाल तापमान ३६, तर किमान तापमान २१ अंश सेल्सिअसच्या घरात होते. रविवारी २८ मार्चनंतर तापमानात अचानक मोठी वाढ झाली आहे. सोमवारी कमाल तापमान ३९, तर किमान तापमान २३ अंश सेल्सिअस नोंदले गेले. कमाल तापमानात वाढ होत असून, भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या सहा दिवसात कमाल तापमान ४० अंशावर, तर किमान तापमान २४ अंशावर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे उन्हाच्या झळा आणखी तीव्र होणार आहेत.
रात्रीचा उकाडाही आता असह्य होत आहे. आठवडाभर आकाश निरभ्र राहण्याचा अंदाजही हवामान खात्याने वर्तविला आहे. जिल्ह्याची सापेक्ष आर्द्रता सोमवारी ९३ टक्के नोंदली गेली. सध्या जिल्ह्याचे कमाल तापमान सरासरीपेक्षा एक अंशाने तर किमान तापमान ३ अंशाने अधिक आहे.