कर्मवीरांचे स्मारक त्यांच्या मातृभूमीत उभारावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:24 IST2021-01-21T04:24:32+5:302021-01-21T04:24:32+5:30
वशी : कर्मवीर अण्णांचे स्मारक त्यांच्या मातृभूमीत उभे करण्यासाठी रयत शिक्षण संस्थेने पुढाकार घ्यावा, त्यासाठी मदतीचे असंख्य हात पुढे ...

कर्मवीरांचे स्मारक त्यांच्या मातृभूमीत उभारावे
वशी : कर्मवीर अण्णांचे स्मारक त्यांच्या मातृभूमीत उभे करण्यासाठी रयत शिक्षण संस्थेने पुढाकार घ्यावा, त्यासाठी मदतीचे असंख्य हात पुढे येतील, असे प्रतिपादन लाडेगावचे सरपंच रणधीर पाटील यांनी केले. ऐतवडे बुद्रुक (ता. वाळवा) येथील कर्मवीर विद्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
पाटील म्हणाले, कर्मवीरांच्या मातृभूमीत त्यांच्या स्मृतींना उजाळा मिळावा, यासाठी विद्यालयाच्या प्रांगणात सर्वसोयींनीयुक्त यथोचित स्मारक उभे राहणे गरजेचे आहे. अण्णांचे चरित्र ग्रंथालय, म्युझियम प्रशिक्षण केंद्र यांसारखे सर्वसोयींनीयुक्त स्मारक उभे राहणे आवश्यक आहे. त्यानंतर सातारा व कुंभोजप्रमाणे हा परिसर शैक्षणिक तीर्थक्षेत्र म्हणून ओळखला जाईल.
सरपंच रणधीर पाटील यांचा सत्कार बाबासाहेब गायकवाड, डॉ. संजय ढगे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक यू. बी. वाळवेकर, बाबासाहेब गायकवाड, ढगेवाडीचे उपसरपंच संजय ढगे, एस. डी. पोपरे, अर्जुन गायकवाड, सुधीर मोरे, अर्चना पाटील उपस्थित होते.