क्रांतिकारकांच्या स्मारकावरील मातीतून दिल्ली येथे स्मृतिस्तंभ उभारणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:26 IST2021-04-04T04:26:41+5:302021-04-04T04:26:41+5:30
मालगाव येथे हुतात्मा स्मारकस्थळी मिट्टी सत्याग्रह करण्यात आला. यावेळी सदाशिव मगदुम, गंगाधर तोडकर, विजयकुमार बस्तवडे, उज्ज्वला म्हैशाळे, अमोल चिक्कोडे ...

क्रांतिकारकांच्या स्मारकावरील मातीतून दिल्ली येथे स्मृतिस्तंभ उभारणार
मालगाव येथे हुतात्मा स्मारकस्थळी मिट्टी सत्याग्रह करण्यात आला. यावेळी सदाशिव मगदुम, गंगाधर तोडकर, विजयकुमार बस्तवडे, उज्ज्वला म्हैशाळे, अमोल चिक्कोडे आदी उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
मालगाव : संयुक्त किसान मोर्चा आणि राष्ट्र सेवा दलाच्या वतीने मालगाव येथे मिट्टी सत्याग्रह करण्यात आला. हुतात्मा रामचंद्र कृष्णा सुतार यांच्या स्मृती स्मारकस्थळी कार्यकर्त्यांनी आदरांजली वाहिली. हुतात्मा सुतार यांचे नातू संजय श्यामराव सुतार यांच्यासह गावातील स्वातंत्र्यसैनिकांचे वारस निर्मला विजयकुमार बस्तवडे, उज्ज्वला म्हैशाळे, अमोल विजय चिक्कोडे, यशवंत तुकाराम सावंत, सुभाष भूपाल माळी, गंगाधर कृष्णा तोडकर, विद्याधर खोलकुंबे आदी उपस्थित होते. त्यांनी स्मारकस्थळावरून माती गोळा केली. ती मडक्यामध्ये भरून दिल्लीतील शेतकरी आंदोलकांना समर्थनार्थ पाठविली जाणार आहे. सेवा दलाचे सदाशिव मगदुम म्हणाले की, क्रांतिकारकांच्या गावागावांतून माती गोळा करून दिल्ली येथे पाठवली जाईल. तेथे शेतकरी आंदोलनस्थळी या मातीतून स्मृतिस्तंभ उभा केला जाणार आहे. सांगली जिल्ह्यातून मगदूम यांच्यासह बाबासाहेब नदाफ, मिलिंद कांबळे, शहाजी गोंगाणे, शाहिस्ता मुल्ला आदी कार्यकर्ते दिल्लीमध्ये जाणार आहेत. यावेळी प्रा. सदानंद काबाडगे, उपसरपंच तुषार खांडेकर, ॲड. के. डी. शिंदे, किरण कांबळे, दिनकर अदाटे, मोहन देशमुख, कॉ. परशुराम कुंडले, रोहित शिंदे, शिवाजी दुर्गाडे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन किरण कांबळे, राजेंद्र कांबळे, तनुजा सोनवणे, करिना नदाफ, अनिशा इंगवले आदींनी केले.
क्रांतिकारक सिंदूर लक्ष्मण यांच्या सिंदूर (ता. जत) येथूनही त्यांच्या परिवाराच्या हस्ते गोळा केलेली माती दिल्लीला नेली जाणार आहे.