बनाळी जिल्हा परिषद गटासाठी शिवसेना, युवा सेनेच्या बैठका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:28 IST2021-09-18T04:28:02+5:302021-09-18T04:28:02+5:30
संख : बनाळी (ता. जत) जिल्हा परिषद गटातील अंतराळ, आवंढी, लोहगाव, बनाळी आदी गावांमध्ये शिवसेना व युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या ...

बनाळी जिल्हा परिषद गटासाठी शिवसेना, युवा सेनेच्या बैठका
संख : बनाळी (ता. जत) जिल्हा परिषद गटातील अंतराळ, आवंढी, लोहगाव, बनाळी आदी गावांमध्ये शिवसेना व युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेण्यात आल्या. पक्षवाढ, पक्ष प्रवेशासाठी पश्चिम विभाग तालुकाप्रमुख संजय सावंत व युवा सेनेचे पश्चिम विभाग तालुकाप्रमुख सचिन मदने यांनी या बैठकांचे आयोजन केले होते.
यावेळी माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांच्याशी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. गाव तिथे शिवसेना व युवा सेनेच्या शाखा स्थापन करण्याचे नियोजन करण्यात आले. अनेक दिग्गजांचा शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश होणार आहे. जिल्हाप्रमुख आनंदराव पवार, संजय विभुते, जिल्हा विस्तार अधिकारी किरण सावंत, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख ॲड. किरण सावंत यांच्या हस्ते शाखांचे उद्घाटन होणार आहे, अशी माहिती तालुकाप्रमुख संजय सावंत व युवा सेनेचे तालुकाप्रमुख सचिन मदने यांनी दिली.