पदयात्री स्मारकास आष्टा पालिकेच्या महिला व बाल कल्याण समिती सदस्यांची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:27 IST2021-04-08T04:27:11+5:302021-04-08T04:27:11+5:30
कासेगाव येथील लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या पदयात्री या स्मारकास भेट देऊन अभिवादन करताना नगराध्यक्ष स्नेहा माळी, पुष्पलता माळी, सारिका ...

पदयात्री स्मारकास आष्टा पालिकेच्या महिला व बाल कल्याण समिती सदस्यांची भेट
कासेगाव येथील लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या पदयात्री या स्मारकास भेट देऊन अभिवादन करताना नगराध्यक्ष स्नेहा माळी, पुष्पलता माळी, सारिका मदने, सारिका खोत, सतीश माळी, रुक्मिणी अवघडे.
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टा : येथील नगर परिषदेच्या महिला व बाल कल्याण समितीच्या सदस्यांनी कासेगाव (ता. वाळवा) येथील लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या पदयात्री स्मारकास भेट देऊन लोकनेते राजारामबापू पाटील यांना अभिवादन केले.
उपसभापती पुष्पलता माळी म्हणाल्या, लोकनेते राजारामबापू पाटील यांनी राज्यासह वाळवा तालुक्याच्या विकासाला गती दिली. सर्वसामान्य जनतेच्या हिताला प्राधान्य देऊन त्यांचा सर्वांगीण विकास केला. इंच न इंच जमीन ओलिताखाली आणून तालुक्याचे नंदनवन केले.
यावेळी नगराध्यक्ष स्नेहा माळी, सभापती शारदा खोत, रुक्मिणी अवघडे, सारिका मदने, वर्षा अवघडे, तेजश्री बोंडे,मंगल सिद्ध, पालिका अधिकारी सारिका खोत, कासेगाव ग्रामपंचायत सदस्य संतोष पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.