प्राथमिक शिक्षकांच्या प्रश्नांबाबत मंत्रालयात बैठक घेणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:24 IST2021-01-18T04:24:37+5:302021-01-18T04:24:37+5:30
महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य नेते संभाजीराव थोरात यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने शरद ...

प्राथमिक शिक्षकांच्या प्रश्नांबाबत मंत्रालयात बैठक घेणार
महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य नेते संभाजीराव थोरात यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने शरद पवार यांची बारामती येथे भेट घेऊन विविध प्रश्नांचे निवेदन दिले. यावेळी पदवीधर विषय शिक्षकांची वेतनश्रेणी, शिक्षणसेवकांची मानधनवाढ, नगरपालिका, महानगरपालिका क्षेत्रातील शिक्षकांचे विविध प्रलंबित प्रश्न यांच्यासह विविध प्रश्नांवर चर्चा झाली. या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी ग्रामविकासमंत्री, नगरविकास मंत्री, शालेय शिक्षणमंत्री व संबंधित विभागातील सर्व अधिकारी यांच्यासोबत शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाची मुंबईमध्ये बैठक घेण्याचे आश्वासन पवार यांनी दिले.
यावेळी सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष विनायक शिंदे, पुणे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब मारणे, अहमदनगरचे आबासाहेब जगताप, सांगलीचे सरचिटणीस अविनाश गुरव, संतोष जगताप, शब्बीर तांबोळी, माणिक कांबळे, चंद्रकांत कांबळे, भगवान कोर, किरण सोहनी, अन्वर मुजावर यांच्यासह शिक्षक संघाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
फाेटाे : १७ तासगाव १