इस्लामपुरात उद्या वारणा धरणग्रस्तांचा मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:25 IST2021-02-14T04:25:15+5:302021-02-14T04:25:15+5:30

इस्लामपूर : सांगली जिल्ह्यातील वारणा धरणग्रस्त व चांदोली अभयारण्य प्रकल्पग्रस्तांचा अपेक्षापूर्ती व फल निष्पती मेळावा सोमवार, दि. १५ फेब्रुवारी ...

Meeting of Warna dam victims in Islampur tomorrow | इस्लामपुरात उद्या वारणा धरणग्रस्तांचा मेळावा

इस्लामपुरात उद्या वारणा धरणग्रस्तांचा मेळावा

इस्लामपूर : सांगली जिल्ह्यातील वारणा धरणग्रस्त व चांदोली अभयारण्य प्रकल्पग्रस्तांचा अपेक्षापूर्ती व फल निष्पती मेळावा सोमवार, दि. १५ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता इस्लामपूर येथील माणकेश्वर हॉलमध्ये आयोजित करण्यात आला आहे. जलसंपदा मंत्री जयंत पाटील, आमदार मानसिंगराव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मेळावा होत आहे.

या मेळाव्यास पुणे विभागाचे आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम, वन संरक्षक प्रमोद धानके, चांदोली राष्ट्रीय उद्यानचे उपसंचालक महादेव मोहिते, जिल्हा पुनर्वसन अधिकारी अरविंद लाटकर, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता डी. डी. शिंदे, शिराळा वन परिक्षेत्र अधिकारी सुशांत काळे, चांदोली वन परिक्षेत्र अधिकारी गोविंद लंगुटे, प्रांताधिकारी नागेश पाटील, तहसीलदार रवींद्र सबनीस, मिरज प्रांताधिकारी समीर शिंगटे यांच्यासह सांगली जिल्ह्यातील वीज विभाग, शिराळा, मिरज तहसीलदार, तसेच संबंधित अधिकारी या मेळाव्यास उपस्थित राहणार आहेत.

Web Title: Meeting of Warna dam victims in Islampur tomorrow