वस्त्रोद्योग व्यावसायिकांची लवकरच सांगलीत बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:29 IST2021-09-18T04:29:22+5:302021-09-18T04:29:22+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : कोरोनाचा राज्यातील वस्त्रोद्योग व्यावसायाला मोठा फटका बसला आहे. या उद्योगाला ऊर्जितावस्था प्राप्त करून देण्याची ...

वस्त्रोद्योग व्यावसायिकांची लवकरच सांगलीत बैठक
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : कोरोनाचा राज्यातील वस्त्रोद्योग व्यावसायाला मोठा फटका बसला आहे. या उद्योगाला ऊर्जितावस्था प्राप्त करून देण्याची गरज आहे. यासाठी सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील वस्त्रोद्योग चालकांची सांगलीत लवकरच बैठक घेऊ, अशी ग्वाही वस्त्रोद्योगमंत्री अस्लम शेख यांनी दिल्याचे कृष्णा व्हॅली चेंबर ऑफ इंडस्ट्रीज अँड कॉमर्सचे अध्यक्ष सतीश मालू यांनी सांगितले.
ते म्हणाले, कोरोना संकटात वस्त्रोद्योग प्रचंड अडचणीत आहे. शासनाकडून अपेक्षित मदत होत नाही. सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात वस्त्रोद्योगाचे मोठे जाळे आहे. या उद्योगाला ‘बुस्टर’ ची गरज आहे. त्यासाठी नुकतेच वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख यांची शिष्टमंडळासह भेट घेतली. वस्त्रोद्योगासमोरील अडचणी संदर्भात त्यांच्याशी चर्चा झाली. मंत्री शेख यांनी दोन्ही जिल्ह्यातील उद्योजकांची एकत्र बैठक कृष्णा व्हॅलीमध्ये घेण्याचे मान्य केले आहे.
यावेळी कुपवाड शिवसेना शहरप्रमुख अमोल पाटील, निखिल जैन, प्रसन्न शहा, नितीन चव्हाण, विक्रम पाटील, संतोष चिकने, निसार मुल्ला आदी उपस्थित होते.