शेटफळेत पोलीस अधीक्षकांची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 04:19 IST2021-04-29T04:19:47+5:302021-04-29T04:19:47+5:30

करगणी : कोरोनाचा हॉट स्पॉट ठरत असलेल्या शेटफळे (ता. आटपाडी) येथे स्थानिक आपत्ती व्यवस्थापन समिती व ग्रामपंचायतीने पाच दिवसांचा ...

Meeting of Superintendent of Police at Shetphale | शेटफळेत पोलीस अधीक्षकांची भेट

शेटफळेत पोलीस अधीक्षकांची भेट

करगणी : कोरोनाचा हॉट स्पॉट ठरत असलेल्या शेटफळे (ता. आटपाडी) येथे स्थानिक आपत्ती व्यवस्थापन समिती व ग्रामपंचायतीने पाच दिवसांचा लॉकडाऊन लागू केला आहे. येथे जिल्हा पोलीस प्रमुख दीक्षित गेडाम यांनी पाहणी केली. यावेळी प्रांताधिकारी संतोष भोर, पोलीस निरीक्षक भानुदास निंभोरे, ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ गायकवाड, उपसरपंच निवृत्ती गायकवाड, विजय देवकर यांसह आपत्ती व्यवस्थापन समितीचे सदस्य उपस्थित होते.

दीक्षित गेडाम यांनी, शेटफळे ग्रामपंचायतीने कोरोना रुग्णांना स्वतंत्र शाळेत ठेवल्याने समाधान व्यक्त केले. ज्या भागात पाचपेक्षा जास्त रुग्ण आहेत अशा भागात मिनी कंटेन्मेंट झोन करण्याच्या सूचना दिल्या. ब्रेक द चेन यशस्वी होण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन समितीने कठोर पावले उचलावीत व त्यास नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.

Web Title: Meeting of Superintendent of Police at Shetphale