प्राथमिक शिक्षकांच्या प्रश्नांबाबत लवकरच बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:47 IST2021-02-06T04:47:58+5:302021-02-06T04:47:58+5:30
शिंदे म्हणाले की, शिक्षक नेते संभाजीराव थोरात व प्रदेशाध्यक्ष बाळकृष्ण तांबारे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने शालेय शिक्षणमंत्री गायकवाड यांची भेट ...

प्राथमिक शिक्षकांच्या प्रश्नांबाबत लवकरच बैठक
शिंदे म्हणाले की, शिक्षक नेते संभाजीराव थोरात व प्रदेशाध्यक्ष बाळकृष्ण तांबारे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने शालेय शिक्षणमंत्री गायकवाड यांची भेट घेऊन प्रलंबित प्रश्नांबाबत चर्चा केली. नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत दाखल झालेल्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी. सातव्या वेतन आयोगातील त्रुटी दूर कराव्यात. प्राथमिक व माध्यमिक शिक्षण सेवकांचे मानधन वाढवून ३० व ४० हजार करावे. प्राथमिक शाळेतील १०० टक्के विद्यार्थ्यांना गणवेश द्यावा. २० पटापेक्षा कमी विद्यार्थी संख्या असलेल्या शाळा बंद करण्यात येऊ नयेत. अंशदान पेन्शन योजना लागू असलेल्या शिक्षकाचा मृत्यू झाल्यावर वारसाला विनाअट दहा लाख रुपये सानुग्रह अनुदान द्यावे. शिक्षकांना वैद्यकीय उपचार इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे कॅशलेश सुविधा देण्यात यावी. वस्ती शाळेत नेमणूक दिलेल्या शिक्षकांची वरिष्ठ वेतनश्रेणीसाठी मूळ नेमणूक दिनांक ग्राह्य धरावा. प्राथमिक शिक्षकांच्या पाल्यांच्या उच्चशिक्षणासाठी फी माफीस आर्थिक तरतूद करावी. उच्च प्राथमिक शाळेला विनाअट मुख्याध्यापक व सेवक पदाला मान्यता द्यावी, जिल्हा परिषद केंद्रीय शाळेसाठी संगणक ऑपरेटर किवा लिपिकाचे पद मान्य करावे. केंद्रप्रमुखांची रिक्त ८० टक्के पदे पदवीधर शिक्षकांतून पदोन्नतीने भरावीत. शिक्षकांना बीएलओसह इतर अशैक्षणिक कामातून मुक्त करावे. जिल्हा षरिषद शाळेतील वीज देयके जिल्हा परिषद फंडातून भरावीत, आदींसह विविध मागण्यांवर चर्चा करण्यात आली. यावेळी शिक्षणमंत्र्यांनी पुढील आठवड्यात सचिव स्तरावर बैठक घेऊन प्रलंबित प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासन दिले.