मराठा सेवा संघाची आज सांगलीत बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:19 IST2021-06-20T04:19:26+5:302021-06-20T04:19:26+5:30
सांगली : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी, समाजाच्या भावना जाणून घेण्यासाठी सांगलीत बैठक होणार आहे. आज, रविवारी मराठा सेवा ...

मराठा सेवा संघाची आज सांगलीत बैठक
सांगली : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी, समाजाच्या भावना जाणून घेण्यासाठी सांगलीत बैठक होणार आहे. आज, रविवारी मराठा सेवा संघ सांस्कृतिक भवनमध्ये ही बैठक आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी दिली. मराठा आरक्षण मिळण्यासाठी आता लढ्याची गरज असून त्याचे नियोजन करण्यासाठी ही बैठक होणार असून समाज बांधवांनी उपस्थित रहावे, असे आवाहन पाटील यांनी केले आहे.
---------------
सांगलीत घरगुती साहित्य लंपास
सांगली : शहरातील घाडगे रुग्णालयाच्याजवळ असलेल्या एका घराच्या स्टोअरेजमधून साहित्याची चोरी करण्यात आली. याप्रकरणी जयंत जीवनकुमार येडेकर (रा. शिवतनय हिरातारा अपार्टमेंट) यांनी शहर पोलिसांत फिर्याद दिली अज्ञाताने कुकर, पितळी परात, छत्री असे ५७५ रुपयांचे साहित्य सायकलवरून चोरून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
----
दलदलीमुळे मैदाने पडली ओस
सांगली : शहरात गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे मैदाने ओस पडली आहेत. कोरोनामुळे बंद असलेले मैदानावरील खेळ, व्यायामाला आताच परवानगी देण्यात आली होती. मात्र, पावसाने सर्वत्र दलदल असल्याने नागरिक बाहेर पडत नाहीत. परिणामी शहरातील प्रमुख क्रीडांगणांसह उपनगरातही मैदाने बंद असून सर्वत्र दलदल निर्माण झाली आहे.
----
वळण मार्गावर अपघाताचा धोका
सांगली : शहरातील मिरज रोडवर असलेल्या वळण मार्गावरील रस्त्यांची दुरवस्था झाल्याने अपघाताची शक्यता वाढली आहे. मिरज रोडवर मार्केट यार्ड, गेस्ट हाऊस, जिल्हा परिषद अध्यक्ष बंगला व विलिंग्डन कॉलेजजवळील वळण रस्ते पावसाने खराब झाले आहेत. या रस्त्यांच्या दुरुस्तीची मागणी होत आहे.
---
मास्क न वापरणाऱ्यांचे प्रमाण वाढतेय
सांगली : जिल्ह्याचा तिसऱ्या स्तरातील समावेशामुळे सर्व व्यवहार चारपर्यंत खुले झाले आहेत. यामुळे बाजारपेठेत गर्दीही वाढत आहे. अशा परिस्थितीतही मास्क न वापरणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. पोलिसांकडून याबाबत वारंवार प्रबोधन करण्यात येऊनही अनेकजण विनामास्क शहरात फिरताना आढळून येत आहेत.