मीना सुर्वे यांची पुस्तके प्रेरणादायी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:31 IST2021-09-17T04:31:07+5:302021-09-17T04:31:07+5:30
फोटो : आष्टा येथे डॉ मीना सुर्वे यांच्या पुस्तकांचे प्रकाशन प्रा. शामराव पाटील, स्नेहा माळी, डॉ दिपक भोसले, डॉ. ...

मीना सुर्वे यांची पुस्तके प्रेरणादायी
फोटो : आष्टा येथे डॉ मीना सुर्वे यांच्या पुस्तकांचे प्रकाशन प्रा. शामराव पाटील, स्नेहा माळी, डॉ दिपक भोसले, डॉ. सूरज चौगुले, वसंत सुर्वे, दीपक सुर्वे, राजेंद्र गवळी यांच्याहस्ते करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टा : डॉ. मीना सुर्वे यांनी खडतर प्रवास करताना जीवनात गुणवत्ता जोपासली. त्यांनी लिहिलेल्या पुस्तकात वास्तवता आहे. ही पुस्तके समाजाला प्रेरणादायी ठरतील, असे प्रतिपादन राजाराम बापू बँकेचे अध्यक्ष प्रा. शामराव पाटील यांनी केले. येथील प्राध्यापिका डॉ. मीना वसंतराव सुर्वे लिखित ‘शैक्षणिक स्पंदन, प्रारब्ध, मनस्वी’ या पुस्तकाचे प्रकाशन प्राचार्या डॉ. मेघा गुळवणी, राजारामबापू बँकेचे अध्यक्ष प्रा. शामराव पाटील यांच्याहस्ते झाले. यावेळी नगराध्यक्षा स्नेहा माळी, डॉ. दीपक भोसले, डॉ. सुरज चौगुले, राजेंद्र गवळी, दिप्ती माने उपस्थित होते.
श्रद्धा लांडे यांनी स्वागत केले. प्रा. रावसाहेब माने, जयश्री महिमान, दीपक मेथे, श्रेयस शिराळकर, यशवंत खोत, अजय शिंदे, मुबारक कावणकर, हिरकणी ग्रुप आष्टा, महाराष्ट्र राज्य युवा प्रतिष्ठान निर्भया मंच कोल्हापूर, हिर गणेश फाउंडेशन आष्टा जायन्ट्स ग्रुप आष्टा यांनी संयोजन केले. दीपक सुर्वे यांनी आभार मानले.