थॅलेसेमिया रुग्णांना आता सिव्हिलमध्ये औषधे उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:26 IST2021-04-10T04:26:49+5:302021-04-10T04:26:49+5:30

सांगली जिल्ह्यात शासकीय रुग्णालयात ही औषधे नियमित उपलब्ध नसल्याने सर्व थॅलेसेमियाग्रस्त रुग्णांची गैरसोय होत होती. समवेदना मेडिकल फाउंडेशन व ...

Medicines are now available in thalassemia patients in civil | थॅलेसेमिया रुग्णांना आता सिव्हिलमध्ये औषधे उपलब्ध

थॅलेसेमिया रुग्णांना आता सिव्हिलमध्ये औषधे उपलब्ध

सांगली जिल्ह्यात शासकीय रुग्णालयात ही औषधे नियमित उपलब्ध नसल्याने सर्व थॅलेसेमियाग्रस्त रुग्णांची गैरसोय होत होती. समवेदना मेडिकल फाउंडेशन व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे व मिरज सिव्हिलचे वैद्यकीय अधीक्षक डाॅ. शिशिर मिरगुंडे यांनी रुग्णांना ही औषधे उपलब्ध करून दिली आहेत. सांगली जिल्हा व सीमाभागातील गरजू थॅलेसेमिया रुग्णांना या औषधांचे वाटप करण्यात आले. ही औषधे आता नियमित उपलब्ध झाल्याने सांगली जिल्ह्यातील बालरुग्णांच्या पालकांना औषधांसाठी सातारा, कोल्हापूर येथे जावे लागणार नाही. सांगली सिव्हिलमध्ये औषधे कायम उपलब्ध करण्यात आली असून गरजूंनी ती घ्यावीत, असे आवाहन अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर, सिव्हिल सर्जन डॉ. संजय साळुंखे, डॉ. शिशिर मिरगुंडे व फौंडेशनचे अध्यक्ष बरकत पन्हाळकर यांनी केले. औषधांची सोय झाल्याने पालकांनी समाधान व्यक्त केले.

Web Title: Medicines are now available in thalassemia patients in civil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.