कोविड सेंटरला औषधांची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:33 IST2021-06-09T04:33:05+5:302021-06-09T04:33:05+5:30

------- रुग्णालयाच्या पार्किंगमधून मोटारसायकल चोरी सांगली : भारती हाॅस्पिटलच्या पार्किंगमधून अज्ञात चोरट्याने मोटारसायकल लंपास केली. ही घटना २१ मे ...

Medicine aid to the Covid Center | कोविड सेंटरला औषधांची मदत

कोविड सेंटरला औषधांची मदत

-------

रुग्णालयाच्या पार्किंगमधून मोटारसायकल चोरी

सांगली : भारती हाॅस्पिटलच्या पार्किंगमधून अज्ञात चोरट्याने मोटारसायकल लंपास केली. ही घटना २१ मे रोजी घडली. याबाबत अरविंद दगडू भगत (वय ५३, रा.पंचमुखी मारुती रोड) यांनी सोमवारी शहर पोलिसांत फिर्याद दिली. पोलीस अधिक तपास करीत आहेत.

-----------

घरासमोरून सायकलची चोरी

सांगली : घरासमोर लाॅक करून लावलेली सात हजार रुपये किमतीची सायकल अज्ञात चोरट्याने लंपास केली. ही घटना शनिवारी घडली. याबाबत विनायक मधुकर कुलकर्णी (वय ३९, रा.श्यामरावनगर) यांनी शहर पोलिसांत फिर्याद दिली.

----------

दीड लाखाची टीव्ही चोरला

सांगली : आकाशवाणी परिसरातील एका घरातून चोरट्याने दीड लाख रुपये किमतीचा टीव्ही चोरून नेला. याबाबत श्रीधर रावसाहेब कोळी (वय २८) यांनी शहर पोलिसांत फिर्याद दिली. चोरट्याने दरवाजाचा कडीकोंयडा तोडून घरात प्रवेश करून चोरी केली.

---------

दुकान फोडून रोकड लंपास

सांगली : आकाशवाणी केंद्रासमोरील एका दुकानातून चोरट्याने सहा हजारांची रोकड व सीसीटीव्हीचा डीव्हीआर चोरून नेला. ही घटना दोन दिवसांपूर्वी घडली. याबाबत अमित संजय कोरे (वय ३७, रा.कोल्हापूर रोड) यांनी शहर पोलिसांत फिर्याद दिली.

-------

आंब्याच्या झाडाची फांदी लंपास

सांगली : माधवनगर येथील हनुमान मंदिर आश्रम ट्रस्ट परिसरातील एका आंब्याच्या झाडाची फांदी चोरट्याने लंपास केली. ही घटना रविवारी रात्री घडली. याबाबत चंद्रकांत शिवमूर्तीया कलमेश्वरमठ स्वामी (वय ६९, रा.रविवार पेठ) यांनी संजयनगर पोलिसांत फिर्याद दिली.

Web Title: Medicine aid to the Covid Center