खासगी डॉक्टरांकडून वैद्यकीय कचरा रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:25 IST2021-05-15T04:25:38+5:302021-05-15T04:25:38+5:30
ओळ : नरवाड-बेडग रस्त्यावर टाकण्यात आलेला वैद्यकीय कचरा टाकळी : मिरज तालुक्यातील नरवाड-बेडग रस्त्यावर वैद्यकीय कचरा उघड्यावर ...

खासगी डॉक्टरांकडून वैद्यकीय कचरा रस्त्यावर
ओळ : नरवाड-बेडग रस्त्यावर टाकण्यात आलेला वैद्यकीय कचरा
टाकळी : मिरज तालुक्यातील नरवाड-बेडग रस्त्यावर वैद्यकीय कचरा उघड्यावर टाकल्याने ग्रामस्थांसह जनावरांचे जीव धोक्यात आले आहे. ग्रामीण भागात कोराेनाचे रुग्ण वाढत असताना खासगी डॉक्टर वैद्यकीय कचरा रस्त्यावर टाकून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आणत असल्याचे चित्र आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून आरग बेडगसह पूर्व भागात कोराेनाचे रुग्ण वाढत आहेत. ग्रामीण भागात काही खासगी डॉक्टरांकडूनही कोराेना रुग्णांवर उपचार करण्यात येत आहे. कोराेनाबाधित रुग्णांवर उपचारासाठी वापरण्यात आलेले पीपीई किट व अन्य साहित्य नरवाड-बेडग रस्त्यावरील स्मशानभूमीपासून काही अंतरावर उघड्यावर टाकण्यात आल्याने ग्रामस्थांसह जनावरांना धोका निर्माण झाला आहे. असे रस्त्यावर वैद्यकीय कचरा टाकणाऱ्या खासगी डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.