शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मध्यरात्री २ तास गावगुंडांचा धुमाकूळ; रिक्षा, कार, स्कूल बससह २० ते २५ वाहनांची तोडफोड
2
जो पोलिसांना सापडला नाही, त्याला मनसेच्या कार्यकर्त्यांना कसा शोधला?; समोर आली थरारक घटना
3
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
4
उपराष्ट्रपतीपदासाठी राजनाथ सिंह यांचे नाव? राष्ट्रपतींनी स्वीकारला धनखड यांचा राजीनामा
5
आजचे राशीभविष्य २३ जुलै २०२५ : या राशींना आजचा दिवस लाभदायी, या राशींसाठी...
6
केवळ १८ महिन्यांचा संसार, मागितली १२ कोटींची पोटगी, बीएमडब्ल्यू! कोर्ट महिलेला म्हणाले... 
7
महिलांना लग्नाच्या जाळ्यात ओढून उकळायचा पैसे; मंदिरात लग्न उरकायचा अन्...
8
‘उडत्या’ मिनेल्ले फारुकीची पाकिस्तानात चर्चा; ठरली देशातील सर्वात युवा पायलट!
9
७/११ बॉम्बस्फोटाच्या निकालाविराेधात सरकार सुप्रीम कोर्टात; गुरुवारी सुनावणी
10
३०० बंधारे आणि छोटी धरणे काढली, चीनची ‘यांगत्सी’ जिवंत झाली, आपण ‘मुळा-मुठेला’ कोंडून मारणार?
11
भोंग्याबाबतचे नियम दुसऱ्यांदा मोडल्यास गुन्हा नोंदवा! राज्याच्या पोलिस महासंचालकांचे आदेश
12
नवे उपराष्ट्रपती निवडताना भाजपला नाही चिंता; ४२२ सदस्यांचे समर्थन; बहुमताने एकच उमेदवार
13
अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार; शिक्षिकेला मिळाला जामीन
14
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा वादात; म्हणे ‘शासनच भिकारी’
15
संपादकीय : ओसाड गावची तोंडपाटीलकी! असंवेदनशील कृषिमंत्र्यांच्या वादांची मालिका
16
दिल्लीत लँडिंग होताच विमानाला अचानक आग; सर्व प्रवासी व कर्मचारी सुखरूप
17
मतदार यादीवरून विरोधक आक्रमकच; पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी कामकाज ठप्प
18
पंचाहत्तराव्या वर्षी निवृत्ती.. संघाचे ‘ठरले’? पण सरकारसाठी नियम वेगळे!
19
धनखड यांनी राजीनामा नेमका का दिला? संसदेबाहेर चर्चा
20
गडचिरोलीत विकासविरोधी कारवायांना विदेशातून फंडिंग! नक्षलींनी बंदुका सोडून मुख्य प्रवाहात येण्याचे आवाहन

महापौरांकडून अंदाजपत्रकात निधीची खैरात

By admin | Updated: May 12, 2017 00:05 IST

महापौरांकडून अंदाजपत्रकात निधीची खैरात

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : वर्षभराने होणाऱ्या महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महापौर हारुण शिकलगार यांनी अंदाजपत्रकात कोट्यवधींच्या निधीची खैरात केली आहे. स्थायी समितीच्या काही कामांना कात्री लावतानाच नगरसेवक, प्रभाग समितीच्या विकास निधीत भरीव वाढ केल्याने महापालिकेचे अंदाजपत्रक ६८० कोटींच्या घरात पोहोचले आहे. विकासापासून वंचित असलेल्या कुपवाडकरांना मात्र अंदाजपत्रकातून दिलासा देताना १८.५० कोटींचे विशेष पॅकेजही दिले आहे. महापौर शिकलगार यांनी गुरुवारी पत्रकार बैठकीत महापालिकेच्या अंदाजपत्रकावर शिक्कामोर्तब केल्याचे सांगितले. महापालिका प्रशासनाने ५७९ कोटींचे अंदाजपत्रक तयार केले होते. त्यात स्थायी समितीने ६४ कोटींची वाढ करीत ते ६४३ कोटींवर नेले. आता महापौरांनी त्यात आणखी ४५ ते ५० कोटींची भर घातली. स्थायी समितीने तब्बल ६६ कोटी रुपयांच्या बायनेम कामांची तरतूद अंदाजपत्रकात केली होती. त्याला मात्र महापौरांनी कात्री लावली आहे. त्याऐवजी नगरसेवक व प्रभाग समितीच्या विकास निधीत वाढ केली आहे. मध्यंतरी कुपवाडकरांनी महापौर शिकलगार व आयुक्त खेबुडकर यांची भेट घेऊन, विकासकामासाठी निधीची मागणी केली होती. त्याची दखल महापौरांनी या अंदाजपत्रकात घेत, कुपवाडकरांना १० कोटींचे विशेष पॅकेज व कुपवाडच्या १७ नगरसेवकांना प्रत्येकी ५० लाख, अशा साडेआठ कोटींच्या निधीची तरतूद केली आहे. सांगलीतील शामरावनगर, कोल्हापूर रोड, गव्हर्न्मेंट कॉलनी, समतानगर, दत्तनगर, हनुमाननगर, रामकृष्णनगर, इस्लामपूर बायपास रस्ता या विस्तारित भागातील पायाभूत सुविधांसाठी १० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. सांगलीचा वाढता विस्तार विचारात घेऊन हिराबाग वॉटर वर्क्स येथील जलशुद्धीकरण केंद्राची क्षमता वाढविली जाणार आहे. सध्या येथे १६ एमएलडी क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र आहे. त्याची क्षमता आणखी १४ एमएलडीने वाढविण्यासाठी साडेचार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. झुलेलाल चौक ते शंभरफुटी रस्ता व कत्तलखाना रस्त्यावरील गटारीसाठी अनुक्रमे ५० व ६० लाख रुपये धरण्यात आले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा सुशोभीकरणावर आतापर्यंत ३० लाख रुपये खर्च झाले आहेत. उर्वरित फरशी व इतर कामासाठी २० लाखांची तरतूद केली आहे. पुष्पराज चौक ते विश्रामबाग चौकापर्यंत एलईडी दिवे बसविणे, बांधकाम मजुरांसाठी निवारा शेड, चौक सुशोभीकरण आदी कामांसाठी भरीव निधीची तरतूद करण्यात आली आहे.