महापौर, सभापतींकडून सरकारी घाटाची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:31 IST2021-09-15T04:31:58+5:302021-09-15T04:31:58+5:30
सांगली : महापालिकेच्या गणेश विसर्जन तयारीचा मंगळवारी महापौर दिग्विजय सूर्यवंशी व स्थायी सभापती निरंजन आवटी यांनी आढावा घेतला. सरकारी ...

महापौर, सभापतींकडून सरकारी घाटाची पाहणी
सांगली : महापालिकेच्या गणेश विसर्जन तयारीचा मंगळवारी महापौर दिग्विजय सूर्यवंशी व स्थायी सभापती निरंजन आवटी यांनी आढावा घेतला. सरकारी घाटाची पाहणी करून विसर्जनाबाबत माहिती घेतली.
या वेळी भाजपचे गटनेते विनायक सिंहासने, नगरसेवक युवराज बावडेकर, सहायक आयुक्त अशोक कुंभार, अग्निशमन अधिकारी चिंतामणी कांबळे उपस्थित होते. महापालिकेने गणेश विसर्जनाची जय्यत तयारी केली आहे. सरकारी घाटावर दोन बोटींसह अग्निशमन दलाची यंत्रणा सज्ज ठेवली होती. महापौर सूर्यवंशी व सभापती आवटी यांनी सरकारी घाटाची पाहणी केली. यावेळी सहायक आयुक्त कुंभार यांनी विसर्जन तयारीची माहिती दिली. सभापती आवटी यांनी मूर्ती केंद्रालाही भेट दिली. तसेच विसर्जन कुंडाचीही पाहणी केली. महापालिकेने विसर्जनासाठी २८ कुंड, ७ कृत्रिम तलाव, दोन फिरती केंद्र उभारली आहेत. नागरिकांनी मूर्तीचे नदीपात्रात विसर्जन करू नये. कृत्रिम कुंड व तलावात विसर्जन करावे, असे आवाहनही महापौर, सभापतींनी केले.