कडेगावच्या नगराध्यक्षा; उपनगराध्यक्षांचा राजीनामा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:28 IST2021-04-02T04:28:28+5:302021-04-02T04:28:28+5:30
दरम्यान, नगराध्यक्षांनी निवड होईपर्यंत जिल्हाधिकारी यांनी तहसीलदार डॉ. शैलजा पाटील यांच्याकडे पदभार सोपविला आहे. कडेगाव नगरपंचायतची निवडणूक २०१६ मध्ये ...

कडेगावच्या नगराध्यक्षा; उपनगराध्यक्षांचा राजीनामा
दरम्यान, नगराध्यक्षांनी निवड होईपर्यंत जिल्हाधिकारी यांनी तहसीलदार डॉ. शैलजा पाटील यांच्याकडे पदभार सोपविला आहे. कडेगाव नगरपंचायतची निवडणूक २०१६ मध्ये झाली. यात कॉंग्रेसने १० विरुद्ध सात असा भाजपचा पराभव करीत एकहाती सत्ता मिळविली. त्यानंतर पहिल्या नगराध्यक्षापदी काँग्रेसच्या आकांक्षा जाधव, तर उपनगराध्यक्षपदी कॉंग्रेसचे साजिद पाटील यांची निवड झाली. त्यानंतर अडीच वर्षांनी नगराध्यक्ष पदासाठी खुला महिला गट असे आरक्षण पडले. त्यानुसार नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी नीता देसाई यांची निवड झाली. उपनगराध्यक्षपदी प्रशांत ऊर्फ राजू जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
आता ५ एप्रिलला नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी अर्ज भरणे, अर्ज छाननी होणार आहे. तर ७ एप्रिल रोजी उमेदवारांची नावे निश्चित होणार आहेत. ८ एप्रिल रोजी अर्ज माघारी; तर ९ एप्रिल रोजी निवडणूक होणार आहे.