शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

सांगलीतील कुपवाडमध्ये महापौर चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा सुरू; राज्यभरातून ३४ संघ, ५०० खेळाडू सहभागी

By श्रीनिवास नागे | Updated: June 2, 2023 13:42 IST

रविवारपर्यंत रंगणार थरार

कुपवाड : महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने आणि महापालिकेच्यावतीने आयोजित निमंत्रित पुरुष व महिला गट महापौर चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेस आज, शुक्रवारपासून सुरुवात झाली. शहरातील नवमहाराष्ट्र हायस्कूलच्या क्रीडांगणावर या स्पर्धा सुरू झाल्या असून, कबड्डीचा थरार ४ जूनपर्यंत रंगणार आहे.

राज्य कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष माजी आमदार दिनकर पाटील यांच्या हस्ते आणि महापौर दिग्विजय सूर्यवंशी व आयुक्त सुनील पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले. पुरुष गटात तरुण मराठा (सांगलीवाडी) विरुद्ध जयहिंद (इचलकरंजी), निर्मल (औरंगाबाद) विरुद्ध राकेशभाऊ घुले (पुणे), गुड मॉर्निंग (मुंबई) विरुद्ध जीएम (अहमदनगर), स्वस्तिक (मुंबई) विरुद्ध शिवाजी व्यायाम मंडळ (वाळवा) या संघांत चुरशीचे सामने झाले. महिला गटात एमडी (पुणे) विरुद्ध शिवशक्ती (सांगली), कर्नाळा (पनवेल) विरुद्ध डायनॅमिक (इचलकरंजी), मातोश्री (कोकरुड) विरुद्ध तरुण भारत (सांगली) आणि शिवाजी उदय (सातारा) विरुद्ध महात्मा गांधी (मुंबई) यांच्यात चुरशीने सामने झाले.सहायक आयुक्त नितीन शिंदे आणि क्रीडाधिकारी महेश पाटील, नकुल जकाते, काका हलवाई यांनी संयोजन केले आहे, तर सुहास व्हटकर समालोचन करत आहेत. उद्घाटन सोहळ्यास जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष रामभाऊ घोडके, राष्ट्रीय कबड्डीपटू गणेश शेट्टी, अर्जुन पुरस्कारप्राप्त एअर इंडियाचे अधिकारी श्रीराम भावसार, राज्य सरचिटणीस बाबुराव चांदोरे, नगरसेवक विष्णू माने, मनगू सरगर, संतोष पाटील उपस्थित होते.

टॅग्स :SangliसांगलीKabaddiकबड्डी