फेब्रुवारीच्या सुरुवातीला कमाल तापमान वाढणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:31 IST2021-02-05T07:31:08+5:302021-02-05T07:31:08+5:30
सांगली : फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यातही जिल्ह्यातील नागरिकांना तापमानातील चढ-उताराचा सामना करावा लागणार आहे. कमाल तापमानात दोन अंशाने तर किमान ...

फेब्रुवारीच्या सुरुवातीला कमाल तापमान वाढणार
सांगली : फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यातही जिल्ह्यातील नागरिकांना तापमानातील चढ-उताराचा सामना करावा लागणार आहे. कमाल तापमानात दोन अंशाने तर किमान तापमानात अंशाने वाढ अनुभवायला मिळणार आहे.
भारतीय हवामान खात्याने नोंदवलेल्या निरीक्षणानुसार जिल्ह्यात रविवारी कमाल तापमान ३२ तर किमान तापमान १७ अंश सेल्सिअस नोंदले गेले. दिनांक २ ते ४ फेब्रुवारी या कालावधीत कमाल तापमानात दोन अंशाने तर किमान तापमानात अंशाने वाढ होणार आहे. त्यानंतर ५ व ६ फेब्रुवारी रोजी कमाल तापमानात पुन्हा दोन अंशाने घट होणार असून, किमान तापमान अंशाने वाढणार आहे. आठवडाभर आकाश निरभ्र राहणार आहे. जानेवारी महिन्यातही हवामानाचा लहरीपणा अनुभवायला मिळाला. बोचऱ्या थंडीचे दिवस असतानाही बहुतांश दिवस तापमान साधारण राहिले. थंडीचे प्रमाण यंदा कमी होते. जानेवारीतील सरासरी किमान तापमानापेक्षा पारा जास्तच राहिला. संपूर्ण हिवाळ्यात हवामानाच्या लहरीपणाचा अनुभव नागरिकांना आला. यामुळे शेतीचेही मोठे नुकसान झाले. आता उन्हाळ्यातील वातावरण कसे राहणार, याची चिंता नागरिकांना लागली आहे.