शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

कुपवाडला मटकाबुकीचा अड्डा उद्धवस्त, एलसीबीची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 17:11 IST

Crimenews, sangli, police कुपवाड (ता. मिरज) येथील मटका बुकीचा अड्ड्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने छापा टाकून रोख रकमेसह २ लाख ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी बुकीचालकासह सहा जणांना अटक करण्यात आली आहे.

ठळक मुद्देकुपवाडला मटकाबुकीचा अड्डा उद्धवस्तएलसीबीची कारवाई : अडीच लाखाचा मुद्देमाल जप्त

सांगली : कुपवाड (ता. मिरज) येथील मटका बुकीचा अड्ड्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने छापा टाकून रोख रकमेसह २ लाख ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी बुकीचालकासह सहा जणांना अटक करण्यात आली आहे.अटक करण्यात आलेल्यात बुकीचालक झाकीर बाबासाहेब मुजावर (वय ४८, रा. बसस्थानकाजवळ, कुपवाड), शकील नसीसाब ढोले (३४, उल्हासनगर), रज्जब मुसा मुजावर (३६, समतानगर), भीमराव बाबुराव शिंदे (६६, समतानगर), दशरथ रामचंद्र जावळे (६०, रा. समतानगर), नासीर कासीम मुश्रीफ (४२, रा. मुजावर गल्ली, मिरज) या सहा जणांचा समावेश आहे.पोलिस अधिक्षक दीक्षीत गेडाम यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यावर कारवाईचे आदेश स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांना दिले आहे. गायकवाड यांनी त्यासाठी विशेष पथक नियुक्त केले आहे. गुरुवारी एलसीबीचे पथक मिरज विभागात पेट्रोलिंग करीत असताना कुपवाड एमआयडीसीमधील शिवशक्तीनगर येथे झाकीर मुजावर हा बुकीमालक याच्या घरात मटक्याचा हिशेब सुरू असल्याची माहिती मिळाली.

एलसीबीच्या पथकाने मुजावर याच्या घरावर छापा टाकला. यावेळी घरात सहाजण मटका जुगार आकाड्याचे मोबाईलवरून प्रिंट काढून हिशेब करीत असल्याचे आढळून आले. पथकाने त्यांच्याकडून मटक्याच्या चिठ्ठ्या, पेन, पॅड, प्रिंटर, स्कॅनर, १२ मोबाईल, दोन मोटारसायकलीसह ५५ हजार ४०० रुपयांची रोकड असा २ लाख ५८ हजार ९८४ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. बुकीचालकासह सहा जणावर गुन्हा दाखल करून सर्वांना कुपवाड एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.या कारवाईत सहाय्यक पोलिस निरीक्षक रविराज फडणीस, उपनिरीक्षक अभिजित सावंत, सुधीर गोरे, इरफान मुल्ला, मुद्दसर पाथरवट, सोहेल कार्तीयानी, दीपक गिड्डे, विकास भोसले, वनीता चव्हाण, प्रियांका धुमाळ, बजरंग शिरतोडे यांनी भाग घेतला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसSangliसांगली