जत, वाळवा तालुक्यात मटका, बेकायदा दारूविक्रीवर छापे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:24 IST2021-02-08T04:24:06+5:302021-02-08T04:24:06+5:30
सांगली : मटका व बेकायदा दारूविक्रीवर पोलिसांकडून सुरू असलेल्या कारवाईत जत व वाळवा तालुक्यातील मटका व बेकायदा दारूविक्रीवर छापे ...

जत, वाळवा तालुक्यात मटका, बेकायदा दारूविक्रीवर छापे
सांगली : मटका व बेकायदा दारूविक्रीवर पोलिसांकडून सुरू असलेल्या कारवाईत जत व वाळवा तालुक्यातील मटका व बेकायदा दारूविक्रीवर छापे टाकण्यात आले.
जत पोलिसांनी केलेल्या कारवाईत गुगवाड येथे मटका घेताना पुंडलिक श्रीकांत मांग (वय ३५) यास अटक करण्यात आली. त्याच्याकडून तीन हजार ३९५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यासह चाँद शेख (२४) आणि सद्दाम इलाई मुल्ला (रा. गुगवाड) या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
धुळकरवाडी येथे संजय निलू राठोड याच्याकडून तीन हजार ६६० रुपयांची दारू जप्त करण्यात आली. बेळोंडगी ते अंकलगी रस्त्यावर चंदू ऊर्फ चंद्रकांत तिप्पाण्णा कोळी (४६ ) याच्याकडून १५४० रुपयांची दारू जप्त करण्यात आली. वाळवा तालुक्यात कुंडलवाडी येथे मन्सूर मौला पटेल (५५ ) याच्याकडून २६१० रुपयांची दारू जप्त करण्यात आली, तर आष्टा येथेही एका महिलेकडून दारू जप्त करण्यात आली आहे.