गुगवाड येथे मटका; तिघांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 05:11 IST2020-12-05T05:11:18+5:302020-12-05T05:11:18+5:30

जत : गुगवाड (ता. जत) येथे बेकायदेशीर जुगार घेत असल्याच्या आरोपावरून मटका बुकी एजंट बाळासाहेब आप्पासाहेब सनदी (वय ...

Matka at Gugwad; Crime on three | गुगवाड येथे मटका; तिघांवर गुन्हा

गुगवाड येथे मटका; तिघांवर गुन्हा

जत : गुगवाड (ता. जत) येथे बेकायदेशीर जुगार घेत असल्याच्या आरोपावरून मटका बुकी एजंट बाळासाहेब आप्पासाहेब सनदी (वय ३८), सद्दाम ईलाही मुल्ला (२६, दोघे रा. गुगवाड, ता. जत) व मटकाबुकी मालक राजू यादव (३८, रा. शिवाजी पेठ, जत) या तिघांविरोधात जत पोलिसात बुधवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्यांच्याकडून तीन मोबाईल व रोख १ हजार १० रुपये असा १६ हजार १० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. गुगवाड येथील बसवेश्वर चौकात बाळासाहेब सनदी व सद्दाम मुल्ला हे दोघेजण चोरून मटका घेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकून त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता, त्याने राजू यादव यांचे नाव सांगितले आहे. त्यामुळे या तिघांविरोधात जत पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

Web Title: Matka at Gugwad; Crime on three