शिराळा उपजिल्हा रुग्णालयास २५ बेडचे साहित्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:26 IST2021-05-13T04:26:49+5:302021-05-13T04:26:49+5:30

फोटो-१२शिराळा४ फोटो ओळी : चिखली (ता. शिराळा) येथे २५ बेडसाठीचे साहित्य शिराळा उप जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. जुबेर ...

Materials of 25 beds for Shirala Sub-District Hospital | शिराळा उपजिल्हा रुग्णालयास २५ बेडचे साहित्य

शिराळा उपजिल्हा रुग्णालयास २५ बेडचे साहित्य

फोटो-१२शिराळा४

फोटो ओळी : चिखली (ता. शिराळा) येथे २५ बेडसाठीचे साहित्य शिराळा उप जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. जुबेर मोमीन यांच्याकडे आमदार मानसिंगराव नाईक यांनी सुपूर्द केले. यावेळी तहसीलदार गणेश शिंदे उपस्थित होते.

शिराळा :

कोरोना संसर्ग झालेल्या रुणांची गैरसोय टाळण्यासाठी शिराळा उपजिल्हा रुग्णालयास २५ खाटा व त्याला लागणारे साहित्य सुपूर्द केले आहे, असे प्रतिपादन आमदार मानसिंगराव नाईक यांनी केले.

चिखली (ता. शिराळा) येथील त्यांच्या निवासस्थानी उप जिल्हा रुग्णालयास साहित्य प्रदान कार्यक्रमानंतर ते बोलत होते. तहसीलदार गणेश शिंदे प्रमुख उपस्थित होते.

आमदार नाईक म्हणाले, या रुग्णालयास २५ बेडचे साहित्य दिले आहे. वाढता कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव व रुग्णांची संख्या विचारात घेऊन रुग्णाच्या सोयीसाठी हे साहित्य मी स्वतः पुरविले आहे. या सर्व २५ बेडला ऑक्सिजनची व्यवस्था केली आहे. त्यामुळे आता उप जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजनच्या बेडची संख्या १०० होणार आहे. रुग्णांची गैरसोय होणार नाही.

आमदार नाईक यांनी हे साहित्य शिराळा उप जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. जुबेर मोमीन यांच्याकडे सुपूर्द केले. यावेळी गट विकास अधिकारी डॉ. अनिल बागल, 'प्रचिती' संस्थेचे अध्यक्ष राजेंद्रसिंह नाईक, डॉ. अनिरुध्द काकडे, महेश जाधव आदी उपस्थित होते.

--

Web Title: Materials of 25 beds for Shirala Sub-District Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.