दिघंचीतील मातंग समाजमंदिर ढासळतेय

By Admin | Updated: March 16, 2015 00:06 IST2015-03-15T22:57:53+5:302015-03-16T00:06:04+5:30

इमारतीची दुरवस्था : चिमुकल्यांचे जीव मुठीत धरून ज्ञानार्जन

The Matanga Samaj Mandir collapsed | दिघंचीतील मातंग समाजमंदिर ढासळतेय

दिघंचीतील मातंग समाजमंदिर ढासळतेय

दिघंची : ५० वर्षांपूर्वी लाकडे गोळा करून व लोकवर्गणीमधून बांधण्यात आलेल्या दिघंची येथील मातंग समाजमंदिराची इमारत मोडकळीस आली असून, त्यामध्येच अंगणवाडीतील चिमुकली मुले जीव मुठीत धरून ज्ञानार्जन करीत आहेत.
दिघंची बसस्थानकाजवळ मातंग समाजाची लोकवस्ती पूर्वीपासून मोठी आहे व या समाजाचे दिघंची गावासाठी मोठे योगदान आहे. या समाजाने शाहिरी वाद्यवृंद कला आपल्यापरीने परिसरात नावलौकिकास आणली. यामध्ये ‘वसंत-जयवंत’ या शाहिरी नावाने समाजाचा शाहिरी ब्रॅण्ड निर्माण केला.५० वर्षांपूर्वी समाजातील तत्कालीन लोकांनी स्वायत्तपणे समाजमंदिर उभारण्याचा चंग बांधला. यामध्ये जगन्नाथ रणदिवे, गुड्डा रणदिवे, सोपाना रणदिवे, पांडुरंग रणदिवे, चितरंग रणदिवे, रामू रणदिवे, श्रावणा रणदिवे, बाबा रणदिवे, शंकर रणदिवे आदींनी परिसरातून लाकडे गोळा करून व लोकवर्गणीतून हे समाजमंदिर उभारले.
या मंदिराचा वापर समाजातील बैठका व सामाजिक कार्यक्रम घेण्यासाठी होऊ लागला. दरम्यान, काही वर्षांनी इमारतीची पडझड झाल्याने तत्कालीन सरपंच सौ. शालन रणदिवे यांनी शासकीय अनुदानातून डागडुजी केली. या इमारतीत एकात्मिक बालविकास सेवा योजनेंतर्गत बालवाडी, अंगणवाडीचा वर्ग भरविण्यात येतो. सध्या या इमारतीचे लाकूड कुजल्याने इमारत धोकादायक बनली आहेत. पाऊस सुरू झाल्यास या इमारतीत पाण्याची गळती सुरू होते. इमारतीचा कोणता भाग कधी कोसळेल, याचा अंदाज नाही. अशा धोकादायक इमारतीमध्ये ही चिमुकली मुले ज्ञानार्जन करीत आहेत. याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. (वार्ताहर)


दिघंचीतील मातंग समाजमंदिर ढासळतेय
इमारतीची दुरवस्था : चिमुकल्यांचे जीव मुठीत धरून ज्ञानार्जन
दिघंची : ५० वर्षांपूर्वी लाकडे गोळा करून व लोकवर्गणीमधून बांधण्यात आलेल्या दिघंची येथील मातंग समाजमंदिराची इमारत मोडकळीस आली असून, त्यामध्येच अंगणवाडीतील चिमुकली मुले जीव मुठीत धरून ज्ञानार्जन करीत आहेत.
दिघंची बसस्थानकाजवळ मातंग समाजाची लोकवस्ती पूर्वीपासून मोठी आहे व या समाजाचे दिघंची गावासाठी मोठे योगदान आहे. या समाजाने शाहिरी वाद्यवृंद कला आपल्यापरीने परिसरात नावलौकिकास आणली. यामध्ये ‘वसंत-जयवंत’ या शाहिरी नावाने समाजाचा शाहिरी ब्रॅण्ड निर्माण केला.
५० वर्षांपूर्वी समाजातील तत्कालीन लोकांनी स्वायत्तपणे समाजमंदिर उभारण्याचा चंग बांधला. यामध्ये जगन्नाथ रणदिवे, गुड्डा रणदिवे, सोपाना रणदिवे, पांडुरंग रणदिवे, चितरंग रणदिवे, रामू रणदिवे, श्रावणा रणदिवे, बाबा रणदिवे, शंकर रणदिवे आदींनी परिसरातून लाकडे गोळा करून व लोकवर्गणीतून हे समाजमंदिर उभारले.
या मंदिराचा वापर समाजातील बैठका व सामाजिक कार्यक्रम घेण्यासाठी होऊ लागला. दरम्यान, काही वर्षांनी इमारतीची पडझड झाल्याने तत्कालीन सरपंच सौ. शालन रणदिवे यांनी शासकीय अनुदानातून डागडुजी केली.
या इमारतीत एकात्मिक बालविकास सेवा योजनेंतर्गत बालवाडी, अंगणवाडीचा वर्ग भरविण्यात येतो. सध्या या इमारतीचे लाकूड कुजल्याने इमारत धोकादायक बनली आहेत. पाऊस सुरू झाल्यास या इमारतीत पाण्याची गळती सुरू होते. इमारतीचा कोणता भाग कधी कोसळेल, याचा अंदाज नाही. अशा धोकादायक इमारतीमध्ये ही चिमुकली मुले ज्ञानार्जन करीत आहेत. याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. (वार्ताहर)


समाजमंदिराच्या दुरवस्थेबाबत विविध खात्यांकडे व पदाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला. परंतु याकडे कोणीही गांभीर्याने लक्ष दिले नाही. विद्यमान आमदार अनिल बाबर यांनी दुरुस्तीबाबत सकारात्मक दृष्टिकोन दाखविला आहे.
- रमेश रणदिवे
तालुका संघटक सचिव

Web Title: The Matanga Samaj Mandir collapsed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.