मसुचीवाडी. भाटवाडीत ‘अनुसूचित जाती’चे आरक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:20 IST2021-02-05T07:20:44+5:302021-02-05T07:20:44+5:30

इस्लामपूर : वाळवा तालुक्यातील ९४ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत शुक्रवारी जाहीर करण्यात आली. निवडणूक झालेल्या मसुचीवाडी आणि भाटवाडी या ...

Masuchiwadi. Reservation of 'Scheduled Castes' in Bhatwadi | मसुचीवाडी. भाटवाडीत ‘अनुसूचित जाती’चे आरक्षण

मसुचीवाडी. भाटवाडीत ‘अनुसूचित जाती’चे आरक्षण

इस्लामपूर : वाळवा तालुक्यातील ९४ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत शुक्रवारी जाहीर करण्यात आली. निवडणूक झालेल्या मसुचीवाडी आणि भाटवाडी या ग्रामपंचायतींमध्ये अनुसूचित जातीच्या विजयी महिला उमेदवारांना सरपंचपदाची संधी मिळणार आहे. तर अनुसूचित जमातीसाठीच्या महिला गटासाठी असलेले एकमेव आरक्षण तांदूळवाडी ग्रामपंचायतीत पडले आहे.

येथील पालिकेच्या जयंत पाटील खुल्या नाट्यगृहातील सभागृहात प्रांताधिकारी नागेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही सोडत काढण्यात आली. यावेळी तहसीलदार रवींद्र सबनीस, दीक्षांत देशपांडे, निवडणूक नायब तहसीलदार सुनील ढाले, महसूलचे वरिष्ठ लिपिक राजू कदम, सुनील साळुंखे उपस्थित होते.

अनुसूचित जाती सर्वसाधारण गटासाठी शिरगाव, ढवळी, इटकरे, बहाद्दूरवाडी आणि वाळवा ही गावे आरक्षित झाली तर अनुसूचित जाती महिला गटासाठी भाटवाडी, कुंडलवाडी, येडेमच्छिंद्र, भवानीनगर, खरातवाडी, मसुचीवाडी आरक्षित झाली. नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण गटासाठी बहे, करंजवडे, पेठ, कुरळप, तुजारपूर, सुरूल, वशी, कोळे, तांबवे, कापूसखेड, ऐतवडे बुद्रुक, ऐतवडे खुर्द, पडवळवाडी ही गावे आरक्षित झाली. नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी कासेगाव, शिवपुरी, बिचूद, नवेखेड, बनेवाडी, वाटेगाव, येडेनिपाणी, रेठरेहरणाक्ष, हुबालवाडी, नरसिंहपूर, साखराळे, बावची, मर्दवाडी या ग्रामपंचायती आरक्षित झाल्या.

खुल्या गटातील सर्वसाधारण जागेसाठी साटपेवाडी, बोरगाव, कारंदवाडी, रोझावाडी, ओझर्डे, रेठरे धरण, कामेरी, जक्राईवाडी, कार्वे, येलूर, देवर्डे, दुधारी, अहिरवाडी, फार्णेवाडी (बी), धोत्रेवाडी, माणिकवाडी, महादेववाडी, नायकलवाडी, जांभुळवाडी, विठ्ठलवाडी, मरळनाथपूर, ठाणापुडे, शिरटे, फार्णेवाडी (एस), पोखर्णी, नेर्ले, ढगेवाडी, चिकुर्डे असे आरक्षण पडले.

खुल्या गटातील सर्वसाधारण महिलांसाठी किल्ले मच्छिंद्रगड, लवणमाची, ताकारी, जुनेखेड, गोटखिंडी, भडकंबे, नागाव, कोरेगाव, शिगाव, काळमवाडी, घबकवाडी, मालेवाडी, भरतवाडी, कणेगाव, गौंंडवाडी, गाताडवाडी, येवलेवाडी, वाघवाडी, शेखरवाडी, डोंगरवाडी, बेरडमाची, मिरजवाडी, फाळकेवाडी, काकाचीवाडी, बागणी, शेणे, केदारवाडी, लाडेगाव ही गावे आरक्षित झाली.

Web Title: Masuchiwadi. Reservation of 'Scheduled Castes' in Bhatwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.