चुडेखिंडी येथे विवाहितेची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:27 IST2021-02-10T04:27:51+5:302021-02-10T04:27:51+5:30
पती बिरूदेव भुसनूर, सासरे सुभाष भुसनूर, सासू अंजना भुसनूर व दीर दऱ्याप्पा भुसनुर हे राणी हिला स्वंयपाक व्यवस्थित करता ...

चुडेखिंडी येथे विवाहितेची आत्महत्या
पती बिरूदेव भुसनूर, सासरे सुभाष भुसनूर, सासू अंजना भुसनूर व दीर दऱ्याप्पा भुसनुर हे राणी हिला स्वंयपाक व्यवस्थित करता येत नाही. असे वारंवार बोलून तुझ्या वडिलोपार्जित जमिनीत हिस्सा दे नाही तर माहेरहून दोन लाख रुपये घेऊन ये, असे म्हणून तिला वारंवार शिवीगाळ व जाचहाट करत हाेते. वारंवार त्रास देऊन त्यांनी राणीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याची तक्रार विजय खंडू बंडगर (रा. राजुरी. ता. सांगाेला) यांनी कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात रात्री उशिरा दिली. त्यानुसार वरील चाैघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रात्री उशिरा पती बिरूदेव, सासरे सुभाष व सासू अंजना यांना अटक करण्यात आली. अधिक तपास सहायक निरीक्षक शिवाजी करे करत आहेत.
फाेटाे : ०९ राणी भुसनुर