शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: आठ दिवसांवर लग्न; सारे घरदार लग्नाच्या तयारीत; अन्‌ विजेच्या धक्क्याने वीज कर्मचाऱ्याचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2023 16:54 IST

कुटुंबीयांचा आक्राेश हृदय पिळवटून टाकणारा

मिरज : सोनी (ता. मिरज) येथे विजेचा धक्का बसून अक्षय बाळासाहेब साखरे (वय २७) (रा. सिध्देवाडी) या महावितरणच्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. अक्षय साखरे हे ट्रान्सफार्मरवर चढत असताना त्यांना विजेचा जाेरदार धक्का बसला. खांबावरून खाली कोसळल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. मृत अक्षय यांचा साखरपुडा झाला हाेता. ३० एप्रिलला विवाह साेहळा ठरला हाेता. घरी लग्नाची तयारी सुरू असतानाचा त्यांचा अपघाती मृत्यू झाल्याने कुटुंबीयांचा आक्राेश हृदय पिळवटून टाकणारा हाेता.सोनी येथून एक किलोमीटर अंतरावर सोनी-उपळावी रस्त्यावर अशोक चव्हाण यांच्या शेताजवळ महावितरणचा ट्रान्सफार्मर आहे. तेथील वीजपुरवठा खंडित झाल्याने गुरुवारी दुपारी चार वाजता अक्षय साखरे दुरुस्तीसाठी गेले होते. तेथून फोनवरून त्यांनी महावितरणच्या कार्यालयास ट्रान्सफार्मरचा वीजपुरवठा बंद करण्यास सांगितला.वीजपुरवठा बंद झाल्याचे गृहीत धरून अक्षय खांबावर चढले, मात्र वीज पुरवठा सुरूच असल्याने त्यांना विजेचा जोरदार झटका बसला. ट्रान्सफार्मरवरून खाली पडून त्यांचा जागीच मृत्यू झाला. महावितरण कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे अक्षय यांचा मृत्यू झाल्याचा आराेप करीत या प्रकरणाची चौकशी होऊन संबंधितावर कारवाई करावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा सोनीचे ग्रामपंचायत सदस्य अरविंद पाटील यांनी दिला आहे.सारे घरदार लग्नाच्या तयारीत अन्‌ आक्रोशअक्षय हा साखरे कुटुंबीयांचा एकुलता मुलगा होता. गेल्याच महिन्यात त्यांचा साखरपुडा झाला होता. ३० एप्रिलला लग्न हाेणार हाेते. घरात लग्नाची तयारी सुरू होती. अक्षयच्या मृत्यूमुळे कुटुंबीयांचा आक्रोश सुरू होता. 

टॅग्स :SangliसांगलीelectricityवीजDeathमृत्यू