चरणला पर्यायी जागा असुनही बाजार रस्त्यावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:23 IST2021-02-15T04:23:20+5:302021-02-15T04:23:20+5:30

कोकरुड : चरण (ता. शिराळा) येथील बाजारासाठी पर्यायी जागा उपलब्ध होऊ शकते. तशी जागाही उपलब्ध आहे. मात्र, ग्रामस्थ, ग्रामपंचायत ...

The market is on the road, despite the alternative location to the steps | चरणला पर्यायी जागा असुनही बाजार रस्त्यावरच

चरणला पर्यायी जागा असुनही बाजार रस्त्यावरच

कोकरुड : चरण (ता. शिराळा) येथील बाजारासाठी पर्यायी जागा उपलब्ध होऊ शकते. तशी जागाही उपलब्ध आहे. मात्र, ग्रामस्थ, ग्रामपंचायत यांच्याकडून आजअखेर यासाठी प्रयत्न होत नसल्याने आणि लोकांचीही मानसिकता नसल्याने दर गुरुवारी भरणारा येथील आठवडा बाजार आता रस्त्यावरच भरु लागला आहे.

किल्ल्याच्या सभोवताली चरण हे गाव वसलेले आहे. १९५४ साली स्वातंत्र्यसैनिक स्वर्गीय बाबूरावदादा चरणकर आणि त्यांच्या बरोबरच्या सहकाऱ्यांनी हा बाजार सुरु केला. काही वर्षातच हा बाजार परिसरात नावारुपाला आला. त्यानंतर याच गावात जनावरांचा बाजारही भरु लागला. यासाठी चरणकर दादा यांनी आपली स्वतःची जागा देऊ केली. सोयी-सुविधा निर्माण करुन दिल्याने सांगली, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांतील शेकडो जनावरे येथे खरेदी-विक्रीसाठी येत असतात.

सध्या कोरोनामुळे जनावरांचा बाजार बंद आहे. मात्र, गेल्या दोन महिन्यांपासून पुन्हा येथील आठवडा बाजार सुरु झाला आहे. त्यातच सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांच्या पश्चिम भागातील वारणा नदीवरील चरण-सोंडोली दरम्यानचा पूल बांधल्याने चरणचे रूपच पालटले आहे. पूर्वी ग्रामपंचायतीच्या आवारात भरणारा गुरुवारचा आठवडा बाजार या पुलामुळे वाढला असून, काही प्रमाणात बाजार राज्य मार्गाच्या दुतर्फा भरतो; तर ग्रामपंचायत परिसरात थोडा बाजार भरत आहे. कायमस्वरूपी बाजारपेठेत असलेल्या दुकानदारांच्या दारातच हा बाजार भरत असल्याने याचा नाहक त्रास ग्राहक व व्यापाऱ्यांना होत आहे.

चाैकट

जागेबाबत उदासिनता

रस्त्यावर भरणाऱ्या बाजारासाठी पर्यायी जागा म्हणून ग्रामपंचायतीच्या मागील बाजूला बाजार भरवता येईल अथवा वाडीवर जाणाऱ्या रस्त्यावरही पर्यायी जागा आहे. तसेच जनावरांचा बाजार बंद झाल्याने ही जागा उपलब्ध होऊ शकते. मात्र, बाजारासाठी नवीन जागा उपलब्ध करुन देण्यात लोकांची उदासिनता आहे. यामुळे व्यापाऱ्यांनी राज्य मार्गावर बाजार सुरु केला आहे. याचा शेतकरी, व्यापारी, ग्राहक, वाहनचालक यांना त्रास सहन करावा लागत आहे.

फोटो-१४चरण१ व २

Web Title: The market is on the road, despite the alternative location to the steps

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.