शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शेतीमाल पुरवठ्याबाबत बाजारपेठेत संभ्रम

By admin | Updated: May 31, 2017 23:19 IST

शेतीमाल पुरवठ्याबाबत बाजारपेठेत संभ्रम

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : रघुनाथदादा पाटील यांच्या शेतकरी संघटनेने पुकारलेल्या शेतकऱ्यांच्या बंद आंदोलनास १ जूनपासून सुरुवात होत आहे. किसान सभेनेही या आंदोलनास पाठिंबा दर्शविला असून, दूध, भाजीपाला, फळभाज्यांचा पुरवठा गुरुवारपासून बंद करण्याचा इशारा संघटनेने दिल्याने, सांगलीच्या बाजारात संभ्रमाचे व चिंतेचे वातावरण आहे. राज्यात अनेक शेतकरी संघटनांनी याबाबतचे आंदोलन पुकारले आहे. सांगली जिल्ह्यात रघुनाथदादा पाटील आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांनी याबाबत शेतकऱ्यांना बंदचे आवाहन केले आहे. आंदोलनाबाबत रघुनाथदादा पाटील म्हणाले की, बंद आंदोलनात शेतकरी स्वत:हून उतरले आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील पुणतांब्यापासून सुरू झालेल्या आंदोलनाची ही धग आता संपूर्ण महाराष्ट्रात पसरणार आहे. आर्थिक संकट शेतकऱ्यांच्या जिवाशी आल्याने, ते स्वत:हून आंदोलनात उतरले आहेत. दूध, फळभाज्या, भाजीपाला यांची विक्री १ जूनपासून बंद करण्यात येईल. शेतीतून तयार झालेला कोणताही माल शेतकरी बाजारात विकणार नाहीत. गावातच वस्तुविनिमय स्वरुपात त्याचा विनियोग होईल. त्यामुळे या आंदोलनाचे चटके हळुहळू बाजारपेठांना आणि पर्यायाने शासनाला बसायला सुरुवात होईल. आंदोलनाची तीव्रता वाढविण्यासाठी येत्या काही दिवसात रास्ता रोकोसारखी आंदोलनेही करण्यात येतील. ते म्हणाले की, शेतकऱ्यांचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न सरकार करीत आहे. यातून सरकारची मानसिकता दिसत आहे. अशाप्रकारे शेतकऱ्यांमधील सरकारविरोधी असंतोष आणखी तीव्र होईल. आंदोलनात अन्य संघटनाही उतरतील अशी आशा आहे. मला किंवा कोणत्याही संघटनेच्या श्रेयाचा हा प्रश्न नाही. त्यामुळेच पुणतांब्यातील आंदोलनात स्वाभिमानी, शरद जोशीप्रणित शेतकरी संघटना, किसान सभा असे सर्वजण एकत्र दिसले. पश्चिम महाराष्ट्रातही हे चित्र दिसेल, अशी आशा आहे. शेतकरी संघटनेचा पाठिंबासांगली : अहमदनगर जिल्ह्यातील पुणतांबे या गावातील शेतकऱ्यांनी संपाची घोषणा केली आहे. त्याला शरद जोशीप्रणित शेतकरी संघटनेचा पाठिंबा आहे. शेतकरी संपावर या आंदोलनांतर्गत दि. १ जूनपासून दूध व भाजीपाला न विकण्याचे आंदोलन जाहीर केले आहे. सरकारला शेतकरी एकजूट दाखवण्यासाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती नेते संजय कोले यांनी दिली. आंदोलनात रस्त्यावर आंदोलन करण्यापेक्षा बांधावरच करण्यात यावे. यासाठी कुटुंबाला लागेल तेवढेच धान्य, भाजीपाला, दूध उत्पादित करावे. तेवढाच पेरा करावा. उर्वरित शेतात हिरवळीचे खत उत्पादित करणारी पिके करावीत. जनावरांच्या चाऱ्याचे उत्पादन घ्यावे. दूध बाजारात नेण्यापेक्षा त्याचे घरीच लोणी, तूप बनवावे. ते दीर्घकाळ टिकते. उत्पादित शेतमाल शहराकडे न पाठवता गावातच विकावा. त्यामुळे आंदोलन शांततेत पार पडेल. शेतकऱ्यांनी आंदोलनात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाप्रमुख रामचंद्र कणसे, जिल्हाध्यक्ष सुनील फराटे, जिल्हा प्रतिनिधी मोहन परमणे, मिरज तालुकाप्रमुख एकनाथ कापसे, माजी जिल्हाप्रमुख शीतल राजोबा आदींनी केले आहे. विक्रेते अनभिज्ञशेतकऱ्यांच्या संपाबाबत अधिकृत माहिती उपलब्ध नसल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात येत आहे. यामुळे सांगलीच्या विविध भाजी मंडईत व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांमध्ये संभ्रम आहे. शेतकऱ्यांच्या शेतीमाल पुरवठा बंदच्या आंदोलनाबाबत अनेकजण अनभिज्ञ आहेत. येत्या दोन दिवसातील परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येणार असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.